दहा दिवसांपासून कांदा लिलाव बंद

By Admin | Updated: May 1, 2017 01:13 IST2017-05-01T01:12:58+5:302017-05-01T01:13:10+5:30

लासलगाव : कांदा लिलावाची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याच्या प्रश्नावरून मार्केट दहा दिवसांपासून असल्याने करोडो रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत

For 10 days, onion auction is closed | दहा दिवसांपासून कांदा लिलाव बंद

दहा दिवसांपासून कांदा लिलाव बंद

लासलगाव : कांदा लिलावाची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याच्या प्रश्नावरून येथील मार्केट दहा दिवसांपासून असल्याने करोडो रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी, स्थानिक व्यावसायिक व कांदा खळ्यात काम करणारे मजूर, ट्रॅक्टर मालक व चालक यांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, धान्याचे बंद झालेले लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत.
बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार आवारावर विक्र ी केलेल्या शेतमालाची चुकवती रोख अथवा एनइएफटीद्वारे अदा करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने गुरुवार, दि. २० एप्रिलपासून बाजार समितीतील कांदा लिलाव बंद राहिले. त्यानंतर निफाड उपबाजार आवारावरील कांदा व धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. तसेच लासलगाव येथील धान्य लिलाव सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती देताना होळकर यांनी सांगितले की,
गेल्या ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर पणन संचालनालय व सहकार खात्याच्या आदेशानुसार चलनपुरवठा सुरळीत होईपावेतो लासलगावसह सर्व बाजार समित्यांनी शेतमाल चुकवतीची रक्कम चेक,आरटीजीएस, एनइएफटीद्वारे करण्यास अनुमती दिली होती. दरम्यान, शेतमाल विक्र ीची रक्कम रोख अथवा एनइएफटीद्वारे अदा करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. शेतमालाचे वजन केल्यानंतर लगेचशेतमालाची रक्कम अदा करण्याची बाजार समितीच्या उपविधीतीत तरतूद असल्याने शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समितीने दि. १३ मार्च पासून व नंतर दि. १ एप्रिल पासुन शेतीमाल विक्र ीची रक्कम रोख अथवा एनइएफटी द्वारे अदा करण्याच्या सूचना व्यापारी वर्गास दिल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये रोख व एनइएफटी द्वारे शेतीमाल चुकवती सुरू झाल्याने इतर बाजार समित्यांप्रमाणेच येथील व्यापारी वर्गाने कार्यवाही करावी यासंदर्भात बाजार समितीने लासलगांव मर्चन्टस असोशिएशनच्या सभासदांशी ३ वेळा चर्चा करून देखील व्यापारी वर्ग चेकद्वारेच चुकवती करीत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले. बाजार समितीने असोशिएशनला कळविल्यानंतर मर्चन्टस असोशिएशनने चर्चा करण्याची बाजार समितीस पत्राद्वारे विनंती केल्याने बाजार समितीने बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यात व्यापारी भूमिकेवर ठाम राहिले़

Web Title: For 10 days, onion auction is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.