शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
2
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
3
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
4
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
5
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
6
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
7
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
8
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जूनला, कामकाज समितीच्या बैठकीला अजित पवार गटाची दांडी
9
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
10
काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
11
PHOTOS : नेपाळच्या 'युवा' संघाचा झंझावात; आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच अश्रू अनावर
12
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
13
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
14
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
15
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
16
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
17
दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
18
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
19
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र
20
केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार

धजापाणी येथे जि.प. शाळा भरते कुडाच्या झोपडीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 1:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुड्याच्या कुशीत तळोदा तालुक्यात वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुड्याच्या कुशीत तळोदा तालुक्यात वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे १०० हून अधिक कुटूंब राहत असून गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसून त्या मिळविण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे मात्र ही शाळा कुडाच्या झोपडीत भरवली जाते.दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा धजापाणी येथील विद्यार्थांना या झोपडीतच शिक्षण घ्यावे लागणार आहे. धजापाणी ग्रामस्थ रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मुलभूत समस्यांपासून आजही कोसोदूर असल्याचे चित्र आहे. धजापाणी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून येथे द्विशिक्षकी शाळा कार्यरत आहे. मात्र शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र असून पक्क्या इमारतीअभावी ही शाळा कुडाच्या भिंतीत असणाऱ्या झोपडीत भरत असल्याची स्थिती आहे. सर्वत्र डिजिटल व अत्याधुनिक शिक्षणाच्या गवगवा केला जात असताना धजापाणी येथील विद्यार्थ्यांना  मात्र पायाभूत सोयी-सुविधाही उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे. पायाभूत सुविधांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभाव असताना कोरोनाच्या काळात ई-लॅर्निंग, डिजीटल लर्निंग यासारख्या गोंडस संकल्पना या केवळ दिवास्वप्नच ठरत आहेत.यासोबतच पाण्याची मोठी समस्या धजापाणी ग्रामस्थांना आहे. महिला व लहान मुलांना डोंगरदऱ्यात भटकंती करत नाला किंवा झिऱ्यातून पाणी आणावे लागते. चढ-उताराच्या डोंगरावरुन पायपीट करीत पाणी आणण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गावात दोन-तीन वर्षापूर्वी वीज पोहोचली. मात्र घरापर्यंत ही वीज पोहोचली नसल्याने ती असून नसल्यासारखी आहे. या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष घालून मुलभूत सुविधांअभावी येथील ग्रामस्थांचे हाल थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आरोग्य सुविधेचाही अभावधजापाणी गावात आरोग्याची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. करडे येथील आरोग्य उपकेंद्राअंतर्गत धजपाणी गाव येत असल्याने केवळ सरकारी लसीकरण,सर्वेक्षण अशा कामांसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात येत असल्याचा अनुभव आहे. गरोदर मातांना आरोग्य केंद्रात घेऊन जायला व घरी सोडायला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जात असली तरी रस्त्याअभावी ‘बांबूलन्स’ या पर्यायाचा वापर ग्रामस्थांना करावा लागतो. धजापाणी हे अतिदुर्गम भागात असणारे गाव असून पुरेशा लोकसंख्येअभावी येथे उपकेंद्र नसल्याचे सांगितले जाते. मात्र रस्त्याचा अभाव व प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती यामुळे गावात कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.