शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

बऱ्याच गावांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने आधी ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांचे नोंदणीसाठी सहकार्य मिळवणे मोठे आव्हान आहे. शिक्षकांनी अत्यंत ...

बऱ्याच गावांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने आधी ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांचे नोंदणीसाठी सहकार्य मिळवणे मोठे आव्हान आहे. शिक्षकांनी अत्यंत संवेदनशीलतेने हे काम लिलया करत लसीकरणाला वेग देण्यासाठी चांगली मदत केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुभवदेखील काही वेगळा नाही. काही ठिकाणी लसीकरण म्हणताच दार बंद केले जाते किंवा बाहेरचा व्यक्ती घरात येऊ नये, याची काळजी घेण्यात येते. मुलांना समस्येवर मात कशी करायची, याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करत जनजागृतीचे काम सुरू ठेवले आहे. अशाच एका ‘मास्तरा’ने आपली दुचाकी काढली. दररोज प्रार्थनेसाठी घेतलेला ध्वनीक्षेपक बंद होता. जनतेला प्रसन्न करण्यासाठी तो गाडीवर ठेवला आणि स्वारी पोहोचली पाड्यावर… घराबाहेर न येणारे ग्रामस्थ गोळा झाले आणि सुरू झाला जनजागृतीचा तास… वसावे यांनी मित्राशी चर्चा करून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे निश्चित केले. स्वत:च्या दुचाकीवरुन ध्वनीक्षेपक आणि माईक घेऊन गुरुवारी ते पाटीलपाड्यावर पोहोचले. अजूनही ग्रामीण भागात ध्वनीक्षेपकाचे आकर्षण असल्याने विखुरलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घरातून बाहेर पडत ऐकू लागले. संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी वसावे यांनी स्थानिक भाषेचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे.

लसीकरणाचे फायदे, लसीकरण कुठे सुरू आहे, लसीकरणासाठी वयाची पात्रता, लस घेऊन आल्यावर घ्यायची दक्षता, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन आदी बाबी दुर्गम भागात पोहोचल्या. शेवटी त्यांनी लसीकरणासाठी आवाहन केले. चार ग्रामस्थ तयार झाले. त्यांनी ही संधी न सोडता मोबाईल कव्हरेजसाठी जवळची टेकडी गाठली. आधारकार्डच्या सहाय्याने नोंदणी केली. समाधानाने स्वारी २९ किलोमीटर दूर असलेल्या आपल्या खापर गावाकडे परतली. दुसऱ्या दिवशी पुढच्या पाड्यावर जायचे आणि परिसरातील दोन-तीन गावात लसीकरण शिबिर भरवायचेच हा निश्चय मनाशी बांधून…

नागरिकांना माहिती दिल्यावर ते प्रतिसाद देतात. काही ठिकाणी दुचाकी ठेवून पायी जावे लागते. पण ग्रामस्थ लसीकरणासाठी तयार झाल्यावर थकवा जाणवत नाही, अशा शब्दात वसावे यांनी आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगितला. यासाठी त्यांना गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी आणि मुख्याध्यापक सुनील मावची यांचे सहकार्य मिळत आहे.

कोट...

रमेश देसले, गटशिक्षणाधिकारी

अत्यंत संवेदनशील आणि हुशार शिक्षक, असे वसावे यांचे वर्णन करता येईल. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्यांचा भर असतो. ते उपक्रमशील आणि अभ्यासू शिक्षक आहेत. नेहमीच झोकून देऊन काम करण्याची त्यांची पद्धत या उपक्रमातही दिसून येते. जनतेचा प्रतिसाद ते मिळवतील, याची खात्री आहे.