युवकाची आत्महत्या की घातपात? शोध घेण्याचे आव्हान
By Admin | Updated: January 16, 2017 00:27 IST2017-01-16T00:27:21+5:302017-01-16T00:27:21+5:30
नंदुरबार : विछिन्न अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृतदेहाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

युवकाची आत्महत्या की घातपात? शोध घेण्याचे आव्हान
नंदुरबार : विछिन्न अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृतदेहाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घातपात, आत्महत्या, की आणखी काही यासंदर्भात शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शहरातील विमल विहार हौसिंग सोसायटी भागात हसमुख भालचंद्र सोनार (34) या युवकाचा मृतदेह शनिवार, 14 रोजी सकाळी आढळून आला होता. खदाणीत असलेल्या या मृतदेहाच्या तोंडाचे लचके आणि दोन्ही हात मोकाट श्वापदांनी तोडले आहेत. हसमुख कोकणीहिल भागात राहतो. त्याच्या मेहुण्यांचे दुकान अमर चौकात आहे. असे असताना तो या निजर्न भागात गेलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा घातपात की आत्महत्या यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांपुढे या घटनेचा शोध घेण्याचे आव्हान आहे.