शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर मान ठेवून युवकाची आत्महत्या, ओळख पटविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

नंदुरबार : रेल्वेखाली आल्याने युवकाची मान व धड वेगळे झाल्याची घटना पाचोराबारी ते नंदुरबार दरम्यान नारायणपूर गावाच्या शिवारात ...

नंदुरबार : रेल्वेखाली आल्याने युवकाची मान व धड वेगळे झाल्याची घटना पाचोराबारी ते नंदुरबार दरम्यान नारायणपूर गावाच्या शिवारात घडली. मृत युवकाची ओळख पटू शकली नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, युवकाने रेल्वे रुळावर मान ठेवून धड बाहेर ठेवले असल्याने त्याची मान व धड वेगवेगळे झाल्याचा अंदाज आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अंदाजे २० वर्षे वयाचा युवक असून सडपातळ शरीर, चेहरा लांब, रंग गोरा व अंगात पांढरा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. २३ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. उधना-दानापूर रेल्वे येत असतांना नारायणपूर शिवारातील रेल्वे ट्रॅकवर युवकाने मान रेल्वेरुळावर ठेवली. त्याचवेळी आलेल्या एक्सप्रेसने त्याची मान चिरडली. त्यात मान व धड वेगळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रेल्वे ट्रॅकमॅन अयुबखान इस्माईल खान यांनी याबाबत माहिती दिल्याने उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार राम वळवी करीत आहे.

मृत युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन उपनगर पोलिसांनी केले आहे.