लगA करून दिले नाही म्हणून युवकाने घर जाळले

By Admin | Updated: April 22, 2017 18:36 IST2017-04-22T18:36:37+5:302017-04-22T18:36:37+5:30

बहिणीला बेदम मारहाण करून युवकाने घर जाळून टाकल्याची घटना नवागाव, ता.तळोदा येथे घडली

The youth burned the house so as not to be seen | लगA करून दिले नाही म्हणून युवकाने घर जाळले

लगA करून दिले नाही म्हणून युवकाने घर जाळले

नंदुरबार, दि. 22 - लगA करून दिले नाही याचा राग येवून बहिणीला बेदम मारहाण करून युवकाने घर जाळून टाकल्याची घटना नवागाव, ता.तळोदा येथे घडली.
नवागाव येथे गणेश पंडित ठाकरे (20) हा आपल्या बहिणीसह राहतो. बहिणीने त्याचे लगA करून द्यावे अशी अपेक्षा त्याची होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्याने आपल्यापेक्षा दोन वर्षानी मोठय़ा असलेल्या बहिणीला घरातच बेदम मारहाण करीत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने गोधडीला पेटवून दिले. परिणामी कुडाच्या घराने लागलीच पेट घेतला. त्यात घरातील संसारोपयोगी साहित्य    जळून खाक झाले.  याबाबत आरती पंडित ठाकरे या युवतीने फिर्याद दिल्याने गणेश पंडित ठाकरे याच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन युवकास रात्रीच अटक करण्यात आली आहे.
   

Web Title: The youth burned the house so as not to be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.