अल्पवयीन मुलीवर युवकाकडून अत्याचार

By Admin | Updated: July 8, 2017 13:49 IST2017-07-08T13:49:17+5:302017-07-08T13:49:17+5:30

मुलीवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Younger child abuse on youth | अल्पवयीन मुलीवर युवकाकडून अत्याचार

अल्पवयीन मुलीवर युवकाकडून अत्याचार

 ऑनलाईन लोकमत

 
नंदुरबार, दि.8 -  घरात कुणी नसल्याची संधी साधत युवकाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना खातगाव, ता.नवापूर येथे 6 रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खातगाव येथील 11 वर्षीय मुलीचे आईवडील बाहेर गावी गेल्याची संधी साधत गावातीलच चंद्रसिंग मनु वसावे (18) हा मुलीच्या घरात घुसला व तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. 7 रोजी सकाळी मुलीचे आई-वडिल बाहेरगावाहून परत आल्यावर त्यांना मुलीला वेदना होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला विश्वासात घेवून विचारले असता तिने  चंद्रसिंग वसावे याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Younger child abuse on youth