शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:28 IST

नंदुरबारमध्ये लहान भावाने धारदार वस्तूने भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये दोन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेल्यानंतर तिचा झगडा मिटविण्यासाठी येत नसल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ९ ऑगस्ट रोजी तेलखेडी शिपाणपाडा ता. धडगाव येथे ही घटना घडली. पुन्या बागडा पावरा (४१) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पुन्या पावरा याचा लहान भाऊ कोटा याची पत्नी दोन वर्षापूर्वी त्याला सोडून निघून गेली होती. यामुळे कोटा हा पुन्या पावरा यांना निंबापूर ता. चोपडा जि. जळगाव याठिकाणी बोलावत होता. पत्नी सोडून गेल्यानंतर तिचा झगडा अर्थात काडीमोडची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोटा सातत्याने मोठ्या भावाला बोलावत होता. परंतू पुन्या हा टाळाटाळ करत होता. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी कोटा हा तेलखेडी शिपाणापाडा येथे आला होता.  दरम्यान ९ ऑगस्ट रोजी कोटा हा तेलखेडी शिपाणापाडा येथे आला होता. याठिकाणी येऊन त्याने भावासोबत वाद घातला होता. या वादादरम्यान लोखंडी टिकाव उचलून पुन्या याने कोटा याच्या डोक्यात वार करून त्याला ठार केले. याप्रकरणी तेंगा बागडा पावरा यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोटा बागडा पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी मारहाण केली नंतर गळा दाबून केला खून

आणखी एका प्रकरणात पतीने पत्नीला मारहाण करुन खून केल्याचा प्रकार घडला. पतीच्या अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता काळटोमी ता. नंदुरबार याठिकाणी घडली. विटाबाई रामा गांगुर्डे (५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी संतोष रामा गांगुर्डे याने नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामा उत्तम गांगुर्डे (५४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विटाबाई यांचा पती रामा गांगुर्डे याचा पर स्त्री सोबत संबंध असल्याचे उघड झाले होते. पतीचे बाहेर अवैध संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नी विटाबाई यांनी त्याला विरोध करत जाब विचारला होता. याचा राग आल्याने आठ ऑगस्ट रोजी दुपारी रामा उत्तम गांगुर्डे याने पत्नी विटाबाई यांना मारहाण करून गळा दाबून खून केला. हा प्रकार समोर आल्यानंतर संतोष गांगुर्डे याने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट माहिती घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस