वागदी शिवारातील डोंगरावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:08 IST2019-08-19T12:08:47+5:302019-08-19T12:08:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : खडकी ता़ नवापुर येथील युवकाचा चुलीबारी डोंगरावरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ ...

वागदी शिवारातील डोंगरावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : खडकी ता़ नवापुर येथील युवकाचा चुलीबारी डोंगरावरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ हा युवक गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेला होता़
अंकलेश दिलीप गावीत (20) रा.खडकी असे मयत युवकाचे नाव आह़े अंकलेश हा वागदी गावाच्या शिवारातील चुलीबारी डोंगरावर मित्रांसोबत घरातील गुरे चारण्यासाठी गेला होता़ दुपारी एक वाजेच्या सुमारास डोंगरावरुन उतरताना पाय घसरल्याने तोल जावून अंकलेश दरीत पडला़ त्याला जखमी अवस्थेत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आल़े याबाबत दिलीप मगन गावीत यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े