शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

आष्टे : राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीज ...

आष्टे : राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीज जोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच नवीन घरगुती वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्जांची सोय करण्यात आली आहे. घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, ही रक्कम पाच समान मासिक हप्त्यांमध्ये वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. महावितरणकडून वीज जोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास १५ दिवसात वीज जोडणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी किंवा कृषी आकस्मिता निधी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च करण्यात येईल. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीज जोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र सोबत जोडावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे अनेकांना अर्ज करताच तत्काळ वीज जोडणी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारांकडे वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज संच मांडणीचा अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेविषयी माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याचे महावितरणच्या नंदुरबार परिमंडळाकडून सांगण्यात आले आहे.

या योजनेमुळे गरजू नागरिकांना तत्काळ वीज जोडणी मिळणार आहे. महावितरणच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचेही महावितरणच्या नंदुरबार परिमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.