शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदा १०० टक्के रब्बी पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या झाल्या आहेत़ नवापुर तालुका वगळता इतर पाचही तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेरा झाला असल्याने शेतशिवारात चैतन्य आहे़सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक अशीच स्थिती आहे़ यातून विहिरींची पातळी ही तब्बल अडीच मीटरपर्यंत वर आली आहे़ यातून शेतकऱ्यांना येत्या मे महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याने त्यांच्याकडून आॅक्टोबर अखेरीपासून रब्बी पेरणी सुरु झाली होती़ यात गहू, मका, हरभरा, इतर कडधान्य तसेच भाजीपाला पिकांचा समावेश आहे़ एकीकडे धान्य, तृृणधान्य, गळीत आणि रब्बी पिकांच्या पेरण्या वाढल्या असताना दुसरीकडे ज्वारी पेरा मात्र निम्म्यावर आला आहे़ सर्वच तालुक्यात रब्बी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे़ यातून जिल्ह्यात केवळ ५७ टक्के रब्बी ज्वारी पेरणी झली आहे़ बºयाच ठिकाणी कापूस हंगाम लांबल्याने शेतशिवारात अद्यापही पिके आहेत़ कापूस पूर्णपणे निघाल्यानंतर ज्वारीचा पेरा होण्याची शक्यता असल्याने यात वाढ होण्याचीही शक्यता आहे़ परंतू हवामानाच्यादृष्टीने ही शक्यता कमीच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ दरम्यान कांद्याच्या दरांनी गेल्या वर्षभरात शेतकºयांना दिलासा दिल्याने जिल्ह्याच्या विविध भागात कांदा लागवडही वाढत असल्याचे चित्र आहे़ पावसामुळे दोन हजार हेक्टरपर्यंत भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढीस लागले असून याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात आहे़ बºयाच ठिकाणी भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन आल्याने दरांमध्ये आतापासून घसरण सुरु झाल्याचेही चित्र आहे़४जिल्ह्यात सर्व सहा तालुक्यात आजअखेरीस २४ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र गहू पेरा करण्यात आला आहे़ नंदुरबार ९ हजार ३३१, नवापुर ३ हजार ३२८, अक्कलकुवा १ हजार ४२५, शहादा ६ हजार १५०, तळोदा ३ हजार ४३६ तर धडगाव तालुक्यात ६८५ हेक्टर क्षेत्रात गहू पेरा झाला आहे़४प्रमुख रब्बी पिकांपैकी एक असलेली ज्वारीचा पेरा मात्र यंदा निम्म्यावर आला आहे़ वार्षिक १६ हजार हेक्टर पेरा होेणारी ज्वारी आजअखेरीस ९ हजार २३१ हेक्टर क्षेत्रातच मर्यादित आहे़ यात नंदुरबार १३८, नवापुर ३ हजार २३८, अक्कलकुवा २ हजार ३१५, शहादा २ हजार ३६०, तळोदा १ हजार १५९ तर धडगाव तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पिक आहे़४रब्बी मक्याची स्थिती मात्र सुधाल्याचे चित्र आहे़ आतापर्यंत ५ हजार ६५ हेक्टरवर रब्बी मका पेरणी पूूर्ण झाली आहे़ नंदुरबार ६८४, नवापुर २ हजार ३७०, अक्कलकुवा १०९, तळोदा १८८ तर धडगाव तालुक्यात ७३६ हेक्टर मका पेरा झाला आहे़जिल्ह्यात गहूनंतर सर्वाधिक पसंती असलेल्या हरभºयाची स्थितीही काही अंशी समाधानकारक अशीच आहे़ नंदुरबार तालुक्यात २ हजार ४०३, नवापुर ३ हजार २८०, अक्कलकुवा २ हजार २७, शहादा ४ हजार ५८८, तळोदा १ हजार ३८७ तर धडगाव तालुक्यात १ हजार ३३९ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती़ जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण २० हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरणी करण्याचे निर्धारण होते़ परंतू प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात १५ हजार २४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे़एकीकडे धान्य आणि कडधान्यांची स्थिती शेतशिवारात चांगली असताना तेलबिया पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे़ नंदुरबार तालुक्यात एक हेक्टरही तेलबिया पिक नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी आणि भूईमूग या पिकांना किमान २ हजार हेक्टरची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात केवळ ६५१ हेक्टरवर तेलबिया पिके असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे़