यंदा जागा जास्त पण विद्यार्थी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:16 IST2019-06-11T12:16:07+5:302019-06-11T12:16:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अकरावी प्रवेशासाठी यंदा स्पर्धा राहण्याची शक्यता कमीच आहे. 189 तुकडय़ांमध्ये 16,240 जागा  असून यंदा ...

This year is high but students lack less | यंदा जागा जास्त पण विद्यार्थी कमी

यंदा जागा जास्त पण विद्यार्थी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अकरावी प्रवेशासाठी यंदा स्पर्धा राहण्याची शक्यता कमीच आहे. 189 तुकडय़ांमध्ये 16,240 जागा  असून यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याची संख्या 14, 840 इतकी आहे. त्यातही अनेक विद्यार्थी डिप्लोपा, आयटीआय व इतर कोर्सेससाठी जाण्याची शक्यता लक्षात घेता काही तुकडय़ा विशेषत: कला शाखेच्या तुकडय़ा ओस पडण्याची शक्यता आहे. 
दहीचा ऑनलाईन निकाल नुकताच लागला आहे. लवकरच अकरावी वर्गाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. दरवर्षी अकरावीच्या विज्ञान वर्गात प्रवेशासाठी विद्याथ्र्याची झुंबड उडते. यंदा मात्र तसे चित्र फारच कमी दिसण्याची शक्यता दिसून येत आहे. असे असले तरी चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी विद्याथ्र्याचा कल अशा ठिकाणी राहण्याची शक्यता कायम आहे.
दहावीनंतर इतर शाखांकडे जाणा:यांची संख्या अतिशय कमी असते. आता सर्वाचा कल हा बारावीनंतर विविध शाखांकडे जाण्याचा आहे. त्यामुळे पालक विद्याथ्र्याना 11 व 12 वी करण्यास उद्युक्त करतात. परिणामी अकरावी प्रवेशासाठी मोठी चढाओढ असते. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक आणि विद्याथ्र्याचा कल असतो. अशा ठिकाणी मोठी स्पर्धा असते. परिणामी मेरीट देखील वाढलेले असते. अशा महाविद्यालयांमध्ये मग जादा तुकडीचे फॅड तयार होऊन त्याद्वारे विद्याथ्र्याकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क उकळले जाते. 
कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या
जिल्ह्यात एकुण 76 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात तर सर्वात कमी धडगाव तालुक्यात आहे. नंदुरबार तालुक्यात 21 अनुदानीत तर सात विनाअनुदानीत किंवा स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण 28 आहेत. नवापूर तालुक्यात नऊ अनुदानीत व तीन विनाअनुदानीत असे एकुण 12, शहादा तालुक्यात 15 अनुदानीत व पाच विनाअनुदानीत किंवा स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण 20 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तळोदा तालुक्यात चार अनुदानीत व दोन विनाअनुदानीत असे सहा, अक्कलकुवा तालुक्यात तीन अनुदानीत व पाच विनाअनुदानीत असे एकुण आठ तर धडगाव तालुक्यात एक अनुदानीत व एक विना अनुदानीत असे एकुण दोन कनिष्ठ महाविद्यालय आहेत. एकुण 53 अनुदानीत व 23 विना अनुदानीत/ स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण 76 कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. 
कला शाखेची यंदाही पंचायत
कला शाखेला दरवर्षी विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. यंदा तर जागा अधीक व विद्यार्थी कमी अशी स्थिती असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला शाखेच्या अनेक तुकडय़ा ओस पडण्याची शक्यता आहे. कला शाखेच्या अनुदानीत, विनाअनुदानीत अशा एकुण 93 तुकडय़ा आहेत. त्यामुळे तुकडय़ा टिकविण्यासाठी संस्थाचालकांची आणि शिक्षकांचीही कसरत होत आहे. परिणामी गावोगावी  शिक्षकांना फिरावे लागत आहे. विद्याथ्र्याना गोळा करावे लागत आहे. विद्याथ्र्याची पास काढणे, त्यांचे प्रवेश करून देणे असे प्रकार सुरू आहेत. 
विज्ञान शाखेकडे कल
विज्ञान शाखेकडे विद्याथ्र्याचा कल असतो. परंतु विज्ञान शाखेच्या तुकडय़ांची संख्या 83 आहे. त्यात 32 अनुदानीत, 42 विना अनुदानीत , एक कायम विनाअनुदानीत तर आठ स्वयंअर्थसहाय्यीत तुकडय़ा आहेत. विज्ञान शाखेत एकुण 7,120 जागा आहेत. 

    तुकडय़ा    कला     विज्ञान    वाणिज्य    संयुक्त    एकूण
    अनु.             78     32                9        4         123
    विना अनु.     13      42               0       0          55
    का.वि.अ.     0          1                0       0             1
    स्वयंअर्थ       2          8             0        0           10
    एकूण तुकडय़ा     93    83    9    4    189

कला शाखा - 8,000
विज्ञान शाखा - 7,120
वाणिज्य शाखा - 680
संयुक्त - 440
एकुण जागा - 16,240 
 

Web Title: This year is high but students lack less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.