शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:04 IST

नंदुरबार :     जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला बसला आहे. कलरवरील 28 टक्के, पीओपीवरील 18 टक्के जीएसटीमुळे आणि काथ्याच्या किमती 500 रुपयांनी वाढल्याने मूर्ती कारागिरांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरीकडे गणेश मंडळ कार्यकर्ते गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती मागत असल्यामुळे किमतीचे समायोजन करताना मोठी कसरत होत आहे.आठ दशकांपेक्षा अधिक वर्षाची परंपरा ...

नंदुरबार :     जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला बसला आहे. कलरवरील 28 टक्के, पीओपीवरील 18 टक्के जीएसटीमुळे आणि काथ्याच्या किमती 500 रुपयांनी वाढल्याने मूर्ती कारागिरांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरीकडे गणेश मंडळ कार्यकर्ते गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती मागत असल्यामुळे किमतीचे समायोजन करताना मोठी कसरत होत आहे.आठ दशकांपेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. चार वर्षापूर्वी थेट आखाती देशात व दक्षिण आफ्रिकेत येथील मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. यंदादेखील गुजरात, मध्य प्रदेश राज्यात मूर्ती पाठविल्या जात आहेत. 35 पेक्षा अधिक लहान-मोठय़ा कारखान्यांमधून एक इंचापासून ते 20 फुटार्पयतच्या हजारो मूर्ती येत्या गणेशोत्सवासाठी आकारास येत आहेत. परंतु यंदा जीएसटीचा फटका मूर्ती उद्योगाला बसला आहे. एकीकडे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि दुसरीकडे मूर्ती विक्रीची किंमत याचा ताळमेळ घालताना मूर्तिकारांचा गोंधळ उडत आहे.कलर व पीओपीवर जीएसटीमूर्ती तयार करण्यासाठी महत्त्वाचे घटक असलेल्या कलर व पीओपीवर अनुक्रमे 28 व 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्हींच्या किमती जबर वाढल्या आहेत. नंदुरबारातील मूर्ती कारागीर इंदूर किंवा सुरत येथून ठोक भावात कलर व पीओपी मागवत असतात. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही वस्तू जवळपास 20 ते 25 टक्के अधिक किमतीत खरेदी कराव्या लागत आहेत. मूर्ती तयार करण्याच्या घटकातीलच एक असलेल्या काथ्याची किंमतदेखील वाढली आहे. गेल्यावर्षी 30 किलोचा गठ्ठा 1150 रुपयांना मिळत होता यंदा तो 1650 रुपयांना मिळत आहे. अर्थात 500 रुपयांची वाढ त्यात झाली आहे. मूर्ती कारागिरांची मेहनत, मजुरांचा पगार, वीज बिल, जागेचे भाडे आणि इतर बाबी यांचा विचार करता मूर्तीच्या किमतीत यंदा वाढ होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील नेहमीची मंडळे मूर्ती बुक करण्यासाठी येतांना गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती बुक करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे परवडत नसतानाही कारागिरांना किमतीबाबत समायोजन करून किमती स्थिर ठेवाव्या लागत आहेत.मूर्ती कलेला घरघरयेथील मूíतकलेला विविध अडचणींमुळे घरघर लागली आहे. शहरात 30 ते 35 मूर्ती कारागीर असून त्यांच्या कारखान्यांसाठी जागा नाही. वीज बिलात सवलत नाही. कला म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहिले जात असल्यामुळे मूर्ती कलेला घरघर लागली आहे. याशिवाय परप्रांतीय मूर्तिकारदेखील शहरात येऊन मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे येथील कारागिरांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नंदुरबारात गणेशपेठसाठी जागा देऊन सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास ही कला टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.घरगुती उद्योग म्हणूनही..नंदुरबारात मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे घरगुती उद्योगदेखील आहेत. जुन्या नंदुरबारातील घराघरांमध्ये महिला, मुले मूर्ती तयार करतात. अगदी एका इंचापासून येथे मूर्ती तयार करण्याची कला अवगत आहे. सध्या शाडूच्या मूर्त्ीना चांगली मागणी असल्यामुळे शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करणारेदेखील अनेकजण तयार झाले आहेत. काही परिवार वर्षानुवर्ष केवळ शास्त्रोक्त पद्धतीनेच मूर्ती साकारत आहेत. अर्थात शास्त्रात मूर्ती साकारण्याचे जे नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत त्यानुसारच ते मूर्ती तयार करतात. त्यात ते कोणतीही तडजोड करीत नसल्याचे दिसून येते. या व्यवसायावर देखीेल नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम दिसून येत आहे.