आमचूर उद्योगाला यंदा दरघसरणीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:52 IST2019-05-12T20:52:31+5:302019-05-12T20:52:42+5:30

राजू पावरा ।  लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : महू आणि आंबा या दोन फळांनी बहरलेल्या सातपुडय़ात आमचूर हंगाम सध्या ...

This year, the Amchoor Industries suffered the highest rate of price hike | आमचूर उद्योगाला यंदा दरघसरणीचा फटका

आमचूर उद्योगाला यंदा दरघसरणीचा फटका

राजू पावरा । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : महू आणि आंबा या दोन फळांनी बहरलेल्या सातपुडय़ात आमचूर हंगाम सध्या वेगात सुरु आह़े वर्षभराचा पैसा एकत्रितपणे मिळणार असल्याने घरोघरी कै:या सोलून सुकवण्याचे काम सुरु आह़े परंतू या अर्थकारणाला यंदा व्यापा:यांनी दरघसरणीचा ब्रेक दिला असून यातून आदिवासींचे नुकसान होत आह़े 
राजस्थान, मध्यप्रदेश आणि थेट दिल्ली परिसरात प्रसिद्ध असलेल्या सातपुडय़ाच्या आमचूरची धडगाव आणि मोलगी या दोन परराज्यातील व्यापारी येऊन खरेदी करतात़ गेल्या वर्षार्पयत तेजीत असलेले दर यंदा अचानक पडल्याने आदिवासी कुटूंबे चिंतेत आहेत़ बाजारपेठेत 160 ते 300 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होणारा आमचूर यंदा 70 ते 150 रुपये प्रतिकिलोर्पयतच विक्री होत आह़े व्यापा:यांकडून दर वाढ करणे टाळले जात असल्याने धडगाव आणि मोलगी या दोन्ही ठिकाणी तुरळक आवक सुरु आह़े गेल्या वर्षी व्यापा:यांनी किमान 60 हजार क्विंटलपेक्षा अधिकची आमचूर खरेदी केल्याचा अंदाज आह़े यातून गरजेपेक्षा अधिक खरेदी झाल्याने यंदा व्यापारी खरेदी करण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आह़े सुकवल्यानंतर त्याची पावडर तयार करुन त्याची बाजारपेठेत विक्री होत असल्याने हा पदार्थ त्यांनी दिर्घकाळ टिकवण्याचे तंत्र आत्मसात केले आह़े यातून कच्च्या मालाच्या बाजारपेठेत दर पाडण्याचे प्रकार सुरु झाल्याने आदिवासी आंबा उत्पादक संकटात सापडला आह़े विशेष म्हणजे आमचूर दरांबाबत बाजार समित्या किंवा कृषी विभाग यांच्याकडे कोणतेही निर्धारण नसल्याने व्यापारी मनाला पटेल तेवढी आणि वाटेल तेवढे दर देत आहेत़ घसरण सुरुच राहिल्यास आदिवासींचे आर्थिक उत्पन्न धोक्यात येणार आह़े 
आंबा कोहळीलाही भाव 
कच्च्या कैरींचा हंगाम सुरू झाल्यानंतर द:याखो:यात, परसबाग आणि शेतबांधावरील आंब्याच्या झाडांना लागलेल्या कै:या तोडीला वेग येतो़ ज्यांची आंब्याची झाडे नाहीत अशांकडून गावोगावी फिरुन आंब्याची झाडे शोधून, झाडावर लागलेल्या कै:यांची खरेदी करण्यात येत़े 5 हजार ते 15 हजार रूपयांर्पयत झाडावरील कै:यांची खरेदी करण्यात येत़े कच्च्या कैरीपासून आमचूर केले जाते तर कैरीमध्ये निघणारी कोहळी व कोहळीमधील गरदेखील विक्री होतो. फोडलेली कोहळी पाच रुपये किलो व कोहळीमधील गर तीन ते चार रुपये किलोने विक्री होत असतो़ दरघसरणीमुळे हा उद्योग यंदा संकटात आह़े 

Web Title: This year, the Amchoor Industries suffered the highest rate of price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.