अक्कलकुवा येथील सुप्रसिद्ध महाकाली मातेचा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:25+5:302021-02-25T04:39:25+5:30
गेल्या वर्षी लाॅकडाऊन लागण्यापूर्वी अक्कलकुवा येथील यात्रोत्सव पार पडला होता. सुमारे १०० वर्षांची परंपरा असलेला हा यात्रोत्सव या महाराष्ट्र ...

अक्कलकुवा येथील सुप्रसिद्ध महाकाली मातेचा यात्रोत्सव रद्द
गेल्या वर्षी लाॅकडाऊन लागण्यापूर्वी अक्कलकुवा येथील यात्रोत्सव पार पडला होता. सुमारे १०० वर्षांची परंपरा असलेला हा यात्रोत्सव या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील भाविकांसाठी पर्वणी ठरतो. याच यात्रोत्सवानंतर खापर येथील यात्रा आणि होळीच्या बाजारांना प्रारंभ होतो. परंतु यंदा कोरोनामुळे भाविकांना ही पर्वणी साधता येणार नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अक्कलकुवा येथील यात्रोत्सवात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या पशुमेळाव्यातून एक कोटी रुपयांची उलाढाल होते. दरवर्षी १० हजार बैल येथे विक्रीसाठी आणले जातात. त्यांच्या खरेदीसाठी तेवढेच व्यापारी व शेतकरी सोरापाडा येथे भेट देतात. सातपुड्यातील गावठी प्रजातीच्या काटक बैलांना शेतीत विशेष महत्त्व असल्याने या ठिकाणी दरवर्षी बैलांची आवक वाढून उलाढालदेखील वाढली होती. सातपुड्याच्या पायथ्याशी भरणाऱ्या या पशुमेळाव्याचे वेगळेपण आजही टिकून आहे. परंतु यंदा मात्र हा मेळावा होणार नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.