नागपंचमीला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:11+5:302021-08-14T04:36:11+5:30

नंदुरबार : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर ...

Worship Nagpanchami, then why punish snakes on other days? | नागपंचमीला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

नागपंचमीला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

नंदुरबार : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर दिवशी मात्र ठार मारले जाते. वर्षभर सापांचा बळी घेण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत असल्याने वनविभागाने याबाबत जनजागृती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात जमिनीतून येणारी उष्णता व बिळांमध्ये पाणी शिरल्यावर साप बाहेर येतात. यातून मग नागरी वस्तींपर्यंत त्यांचा संचार सुरू होता. यातून मग साप दिसला की त्याला जागीच ठेचला पाहिजे अशी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. साप विषारी की बिनविषारी याचीही पडताळणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. यातून जिल्ह्यातून चित्रांग आणि गरगल हे दोन सर्प कायमचे नामशेष झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते.

साप हे थंड आणि दमट जागा शोधतात त्यामुळे ते मानवी वस्तीत भक्ष्य, आणि आसरा शोधण्यासाठी येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ असल्याने एकापेक्षा अधिक साप आढळतात.

विषारी : घोणस, मण्यार, फुरसे, नाग, हिरवा चापडा, चापडा, मांजऱ्या, हरणटोळ, फॉर्स्टनचा मांजऱ्या, तपकिरी हरणटोळ.

बिनविषारी : अजगर, मांडूळ, कवड्या, धामण, नानेटी, त्रावणकोर कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, वाळा, पहाडी तस्कर, कुकरी सर्प

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. शेतात धान्याची नासाडी करणारे उंदीर खाण्याचे काम साप हा करत असतो. एकप्रकारे साप शेतकऱ्याची अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो. मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज व सापांबद्दल असलेली भीती यामुळे सापाला अनेकजण शत्रुच समजतात.

साप आढळला तर...

नागरिकांना घरात साप आढळल्यास त्याला मारून न टाकता वनविभाग किंवा सर्पमित्रांना कळवावे,

सर्पमित्र येईपर्यंत सापाच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष देत राहिले पाहिजे.

सापापासून लहान मुले, पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे, साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तरच त्याला पकडावे अन्यथा सर्पमित्र येण्यापर्यंत वाट पाहून लक्ष ठेवावे.

Web Title: Worship Nagpanchami, then why punish snakes on other days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.