शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

उंटावद ते मलोणी पुलाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे प्रशासनासह ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले असल्याने लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुलाच्या अंतीम टप्प्यातील काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहादा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील उंटावद ते मलोणीकडे जाणाºया मार्गावरील गोमाई नदीवर हा पूल उभारण्यात आला असून, या पुलाच्या अंतिम टप्प्यातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा आधार घेत संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्याची चर्चा आहे. अंतीम टप्प्यातील हे काम एका महिन्यात पूर्ण होणार होते मात्र या डबक्यामुळे ते चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून ठेकेदारास काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे डोळे असून, आंधळ्याचे सोंग करीत असल्याचा आरोप केला जात आहे.येत्या चार महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम झाले नाही तर पुन्हा एक वर्ष या पुलाच्या बांधकामासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देवून संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.ठेकेदारास दोंडाईचा येथे नवीन काम मिळाले असल्याने तो या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. हा ठेकेदार नवीन कामामुळे जुन्या कामाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करून संबंधित पुलाचे काम येत्या महिनाभरातच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे