मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणास महिलांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:40+5:302021-01-13T05:21:40+5:30
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाड्यात, गावातील ...

मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणास महिलांचा प्रतिसाद
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाड्यात, गावातील सर्व किशोरवयीन मुली तसेच मातांपर्यंत हा विषय पोहोचविण्याचे आवाहन केले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी मासिक पाळी या विषयावर वैद्यकीय दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती सांगून उपस्थितांशी संवाद साधला व या विषयाबाबत अधिक काम करण्यासाठी सर्वांना आवाहन केले. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी मासिक पाळी हा संवेदनशील विषय आहे. या विषयावर फारसे बोलले जात नाही. या विषयाबाबत गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत त्याचे निराकरणाचे आपल्या कार्यक्षेत्रात काम करावे यासाठी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथील उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी किशोरवयीन मुलींसाठी हा विषय खूप महत्त्वाचा असून, उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी या विषयाची माहिती घेऊन शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचविण्याचे आवाहन केले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भटकर यांनीही मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ सुलभक म्हणून डायटच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार, विषय सहायक प्रकाश भामरे, नरेंद्र पाटील, गायत्री पाटील, सीमा पाटील यांनी काम केले. युनिसेफमधून अपर्णा कुलकर्णी यांनी केस स्टडी सांगून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, विषय सहायक संदीप पाटील, प्रकाश भामरे यांनी तांत्रिक जबाबदारी पार पाडली, तर वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, बी. आर. पाटील, पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे व सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेचे सहकार्य लाभले.