नंदुरबार : तापी नदी पात्रात महिलेचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:20 IST2023-04-13T18:20:47+5:302023-04-13T18:20:56+5:30
याप्रकरणी सारंगखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार : तापी नदी पात्रात महिलेचा बुडून मृत्यू
रमाकांत पाटील
नंदुरबार : येथील तापी नदीच्या पात्रात दि. १३ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आशाबाई नागो मोरे (वय ४५, रा. हरी कॉलनी, साक्रीरोड, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. तापी पात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सारंखेडा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ, उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी कर्मचाऱ्यांसह भेट देत मृतदेह बाहेर काढला. महिलेची ओळख पटल्यानंतर नातेवाइकांना कळविण्यात आले. भूषण नागो मोरे (रा. धुळे) यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.