देवमोगरा येथे अक्कलकुवा महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:47 IST2020-01-11T12:47:48+5:302020-01-11T12:47:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथील विद्या विकास मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे देवमोगरा येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर घेण्यात येत ...

Winter camp of Akkalkuwa College at Devamogara | देवमोगरा येथे अक्कलकुवा महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर

देवमोगरा येथे अक्कलकुवा महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथील विद्या विकास मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे देवमोगरा येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर घेण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांमधील कला गुणांना व्यासपीठ देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होणार आहे.
कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ.एस.बी.पाटील, सिनेट सदस्य डॉ.दिनेश खरात, जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी दिशा वळवी, डॉ.ए.व्ही.बाविस्कर, जे.बी.बागुल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश पाडवी, माध्यमिक मुख्याध्यापक दारासिंग वळवी, जगदिश पवार, योगेश सोनवणे, प्रा.एस.एस.पवार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.खरात यांनी हिवाळी श्रमसंस्कार शिबीर हे विद्यार्थ्यांना अनेक बाबींची शिकवण देणारे असून यामुळे प्रत्येकांमध्ये व्यक्तीमत्वाचा विकास होतो. व्यासपीठावर उभे राहण्याचे बळ याच उपक्रमांमधून मिळत असते, असेही खरात यांनी सांगितले.

Web Title: Winter camp of Akkalkuwa College at Devamogara