निर्यातक्षम उत्पादनांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST2021-09-25T04:32:54+5:302021-09-25T04:32:54+5:30

या संमेलनात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांना निर्यातवाढीसाठी निर्यातक्षम उत्पादने व सेवा तसेच उत्पादनाशी संबंधित निर्यातीच्या संधी ...

Will provide facilities for exportable products - Collector | निर्यातक्षम उत्पादनांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

निर्यातक्षम उत्पादनांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

या संमेलनात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांना

निर्यातवाढीसाठी निर्यातक्षम उत्पादने व सेवा तसेच उत्पादनाशी संबंधित निर्यातीच्या संधी व निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया, सेवा, सुविधांबाबत माहिती घेत जिल्ह्यातील उद्योजक व निर्यातदारांशी चर्चा करुन उद्योगांबाबत येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

चौधरी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकार सहायित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती दिली.

प्रास्ताविकात बोलताना पाटील यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी असून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्र बनविण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.

या वेळी थावरे, देवा नंद, देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या संमेलनास जिल्ह्यातील विविध

उद्योजक, शेतकरी गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Will provide facilities for exportable products - Collector