शनिमांडळ येथे लग्न घराला आग लागून संसारोपयोगी सामान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:29+5:302021-01-10T04:24:29+5:30
हळदीच्या कार्यक्रमानंतर शनिश्वर भक्तनिवास येथे घरातील सर्व सदस्य जेवणासाठी गेले असताना घरात अचानक शॅाटसर्किट झाल्यामुळे घरात आग पसरली, बाहेरून ...

शनिमांडळ येथे लग्न घराला आग लागून संसारोपयोगी सामान जळून खाक
हळदीच्या कार्यक्रमानंतर शनिश्वर भक्तनिवास येथे घरातील सर्व सदस्य जेवणासाठी गेले असताना घरात अचानक शॅाटसर्किट झाल्यामुळे घरात आग पसरली, बाहेरून लाग लागल्याचे दिसून आले, मात्र घराला कुलूप लावले असल्याने आग विझविण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. लग्न समारंभात अचानक घटना घडल्याने सर्वांच्या आनंदोत्सवात विरजण पडले. नुकसानभरपाईसाठी संबंधित घटनेचा तलाठी एन. के. राठोड यांनी पंचनामा केला आहे.
आगीत नवरदेवाचे कपडे जळाले
नवरदेवासाठी आणलेल्या कपडे व सामान आग लागल्याने जळून गेले. घरातील सदस्यांचे कपडे व इतर सामान जळून गेले. या घटनेमुळे लग्न समारंभ कानबाई उत्साहानुसार साध्या पद्धीत करण्यात आले. बाहेरून आलेल्या पाहुण्यासाठी जेवणाची साधी सोय यावेळी करण्यात आले.
गावातील तरुणांनी पुढे केले मदतीचे हात
लग्नसमारंभ असलेल्या घरी आगीत सर्वकाही नष्ठ झाल्यामुळे गावातील तरुणांनी नवरदेवावर अचानक आलेल्या संकटाची जाणीव करून सकाळीच निधी उभा करून दिल्यामुळे लग्न संमारभात मोठी मदत झाली. या मदतीमुळे लग्न समारंभास काहीसा हातभार लागला.
आगीत लग्न व जीवनावश्यक वस्तू खाक
घरात नवरदेव व घरातील सदस्याचे कपडे, लग्नासाठी आणलेल्या वस्तू, अन्नधान्य, कापूस व दोन लाख रुपये रोकड जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले आहे.