अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 14:40 IST2023-06-22T14:39:46+5:302023-06-22T14:40:10+5:30
सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना
नंदुरबार जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने मदत जाहीर करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू आणि मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते तर या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून त्वरित करण्यात आलेले होते. परंतु दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही आह. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकरी कशी करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला त्यामुळे आता खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा लागली आहे. मात्र शासनाकडून वेळेत मदत मिळाली तर खरीप हंगामाची तयारी करता येणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
सरकार शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत नेमकी कुठे थांबली आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागावी, असा संभ्रम शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.