शहाद्यात जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:28 PM2020-06-02T13:28:28+5:302020-06-02T13:28:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गांधीनगर भागात असलेल्या जलकुंभावरून शहरातील जुन्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला सोमवारी पहाटे ...

Water was lost due to leakage of water in Shahada | शहाद्यात जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याची नासाडी

शहाद्यात जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याची नासाडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील गांधीनगर भागात असलेल्या जलकुंभावरून शहरातील जुन्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला सोमवारी पहाटे गळती लागल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. गळतीतून वाहणाºया पाण्यामुळे परिसरातील पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचले होते.
शहरातील मध्यभागी गांधीनगरमध्ये असलेल्या जलकुंभावरून भवानी चौक, सरदार वल्लभाई पटेल चौक, गांधी चौक, मीरानगर, स्वीपर कॉलनी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला सोमवारी पहाटेच्या सुमारास गळती लागली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागात असलेल्या कुपनलिकेतून पाण्याच्या पुरवठा करण्यात आला.
गळती लागलेल्या ठिकाणी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्वत: उपस्थित राहून युद्धपातळीवर काम सुरू केले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम थोडेच बाकी असून टेस्टिंग करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता संदीप चौधरी यांनी दिली.

Web Title: Water was lost due to leakage of water in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.