शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:48 IST

गेल्या आठवडय़ातील पावसाचा परिणाम : रब्बी हंगामाला होणार फायदा

ठळक मुद्दे विरचक प्रकल्पाला अद्यापही प्रतिक्षाच.. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात अद्यापही केवळ 40 टक्केच पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या आधी असलेले आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यावरच शिवण नदीतून विरचक प्रकल्पात पाणी येत असते.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. असे असले तरीही दहा लघु प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 12 प्रकल्प पुर्णपणे भरले असून एकुण  64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे किमान रब्बी हंगामाला तरी त्याचा फायदा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा अनियमितपणा आहे. आधीच जून महिन्यात उशीराने पाऊस झाला. जुलै महिन्यातील सरासरी देखील पुर्ण झाली नाही. ऑगस्ट महिन्यात ब:यापैकी हजेरी लावल्याने पावसाची टक्केवारी वाढली. सध्या 77.63 टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ब:यापैकी असून गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच टक्के तूट मात्र कायम आहे.शहादा, नवापूर तालुके कोरडेयंदा देखील शहादा व नवापूर तालुक्यावर वरुणराजा मेहरबान नसल्याची स्थिती आहे. सर्वात कमी पजर्न्यमान शहादा तालुक्यात सरासरीचा अवघा 56.41 टक्के पाऊस झाला आहे. तर नवापूर तालुक्यात 66.70 टक्के पाऊस झाला आहे. याउलट सर्वाधिक पाऊस  हा धडगाव तालुक्यात 99.55 टक्के झाला आहे. धडगाव तालुका सरासरी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात 83.99 तर नंदुरबार तालुक्यात 82.97 टक्के पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात 79.35 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर सरासरीचा 540.58 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा 647.67 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी दोन तालुक्यांची सरासरी पाच टक्क्यांनी कमीच असल्याचे चित्र आजही कायम आहे.पाणीसाठा वाढलागेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात एकुण   37 लघु व चार मध्यम प्रकल्प   आहेत. याशिवाय सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस असून त्या   माध्यमातून शेती सिंचनाची व्यवस्था केली जाते. सध्या लघु प्रकल्पांमध्ये 68.26 तर मध्यम प्रकल्पांमध्ये 62.73 टक्के पाणीसाठा आहे. एकुण दोन्ही प्रकल्प मिळून 64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे.  त्यात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प देखील पुर्णपणे भरला आहे. राणीपूर प्रकल्पात 60.67 टक्के पाणीसाठा आहे. विरचक प्रकल्पात 40.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये किमान पाच ते 20 टक्के पाणीसाठय़ाची वाढ गेल्या आठवडय़ाभरात झाली आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या दोन्ही तालुक्यातील आठपेक्षा अधीक  प्रकल्पात 25 टक्कपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याउलट नंदुरबार, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात नियमित पावसाळा आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील परतीचा पाऊस यामुळे पावसाची टक्केवारी आणखी वाढून किमान प्रकल्पातील पाणीसाठय़ात देखील वाढ होण्याची शक्यता  आहेच.रब्बीला फायदाया पाणीसाठय़ाचा फायदा रब्बी पिकांना होतो. त्यामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरी 76 टक्के पाणीसाठा झाला होता. जानेवारीअखेर या पाणीसाठय़ाचा उपयोग रब्बी पिकांसाठी केला जात असतो. मात्र, उन्हाळ्यात प्रकल्पांमध्ये ठणठणाट असतो.