Water scarcity in Tahawad Rehabilitation Colony | तºहावद पुनर्वसन वसाहतीत पाणीटंचाई

तºहावद पुनर्वसन वसाहतीत पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या तळोदा तालुक्यातील तºहावद येथील पुनर्वसन वसाहतीतील दोन्ही कुपनलिका आटल्याने बाधितांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शेत शिवारातून पाणी आणावे लागत असल्याचे विस्थापीत सांगतात. दरम्यान, ग्रामपंचायतीने साठ ते आठ दिवसांपूर्वी नवीन कुपनलिका केली आहे. परंतु त्यात मोटार टाकण्यात आलेली नसल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे तळोदा तालुक्यातील तºहावद पुनर्वसन या वसाहतीत पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण ४३८ कुटुंबे येथे राहत असतात. वसाहतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन कुपनलिका करण्यात आल्या आहेत. त्याच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी ७५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्याही बांधल्या आहेत. तथापि वसाहतीमध्ये पाणी कसे बसे येत होते. परंतु तेही आठ ते १० दिवसांपासून पूर्णपणे आटल्याचे बाधित सांगतात. त्यामुळे आम्हाला वसाहतीपासून लांब असलेल्या शेतातील कुपनलिकांमधून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. सद्या ग्रामपंचायतीने नवीन बोअर केला आहे. परंतु त्याचात मोटार टाकण्यात आली नाही. त्यामुळे कुपनलिकेत पाणी आहे की नाही असाही प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रशासनाने वसाहतीतील पाण्याचा बिकट प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, तºहावद येथील वसाहतीतील तीव्र पाणीटंचाई व अपूर्ण जल वाहिन्यांचा प्रश्न तळोद्यातील नवसंजीवनीच्या बैठकीतही गाजला होता. याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रकल्पाधिकाºयांनी दिल्या.

नळपाणी पुरवठा निरूपयोगी अथवा वीजेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वसाहतीत जवळपास आठ हातपंप करण्यात आले आहेत. परंतु हे हातपंप गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यातील पाणी आटल्यामुळे ते बंद असल्याचे नागरिक म्हणतात. वास्तविक एवढ्या दिवसांपासून ते बंद आहेत. त्यातील पाणी आटले की, ते नादुरूस्त झालेले आहेत. याची खातर जमा होणे अपेक्षित असतांना त्याबाबत कुठलीही तसदी घेण्यात आली नसल्याचेही तेथील रहिवाशी सांगतात. याबाबत पंचायत समितीकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. दरम्यान येथील पाणीटंचाईवरील ठोस उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाकडेही वसाहतधारकांनी लेखी तक्रार केली आहे. या निवेदनावर १५० बाधितांच्या सह्या आहेत.

या वसाहतींमध्ये डनेलपाड्यातील बाधितांना पाणी येते. परंतु दुसºया भागात पाणी येत नाही. ग्रामपंचायीने नुकताच दुसरा बोअर केला आहे. तरीही त्यांचे पाणी टंचाईचे ‘पपत्र अ’ भरून तत्काळ उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यात येईल.
-राहुल गिरासे, शाखाअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, तळोदा

आमच्या वसाहतीत गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन्ही कुपनलिकांबरोबरच हातपंपही निकामी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
-शामजी वसावे, प्रकल्पबाधित, तºहावद पुनर्वसन, ता.तळोदा

Web Title: Water scarcity in Tahawad Rehabilitation Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.