संस्थेच्या पुढाकारातून वाया जाणारे पाणी अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:27 PM2019-09-04T12:27:54+5:302019-09-04T12:28:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावालगत असलेले धरण पूर्ण भरले असून या धरणाच्या सांडव्यातून वाहणा:या पाण्याचा शेतक:यांना ...

The wastewater was prevented from the initiative of the Institute | संस्थेच्या पुढाकारातून वाया जाणारे पाणी अडविले

संस्थेच्या पुढाकारातून वाया जाणारे पाणी अडविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील लोंढरे गावालगत असलेले धरण पूर्ण भरले असून या धरणाच्या सांडव्यातून वाहणा:या पाण्याचा शेतक:यांना योग्य उपयोग व्हावा यासाठी गंगोत्री फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाऊंडेशनतर्फे पोकलेन मशीनद्वारे पाटचा:या व नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन विहिरी व कुपनलिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.
शहादा तालुक्यात 15 दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाले प्रवाहीत झाले आहेत. तालुक्यातील लोंढरे गावाजवळील धरणही ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यातून पाणी वाहत आहे. वाहून जाणा:या पाण्याचा योग्य विनीयोग व्हावा यासाठी शहादा येथील गंगोत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष व जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी पोकलेन मशीनद्वारे पाटचा:या व नाल्यांचे खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. 
या धरणाच्या परिसरातील शेतक:यांनी जि.प. सदस्य अभिजित पाटील यांची भेट घेऊन धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अभिजित पाटील यांनी गंगोत्री फाऊंडेशनच्या वतीने  पोकलेन मशीनद्वारे पाटचारी व नाले खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील जयनगर, कवठळ, वरुळ कानडी व परिसरातील शेतक:यांना पाण्याचा उपयोग होणार आहे. या धरणाच्या पाटचारीद्वारे वाहून जाणारे पाणी कहाटूळ गावाकडे नेण्यात येणार आहे. 
पाटचा:या व नाले प्रवाहीत होऊन अनेक वर्षापासून बंद पडलेल्या कुपनलिकांनाही पाणी येणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, सरपंच राहुल पाटील, हिंमतराव रोकडे, शहाजी देसले, सुरेश गिरासे, विजय पाटील, निळकंठ सिसोदे, महेंद्र देसले, अमोल सनेर, देविदास नेरपगार, किरण पाटील, पंकज नेरपगार, नीलेश सनेर, लोंढरे, जयनगर, धांद्रे परिसरातील शेतक:यांनी गंगोत्री फाऊंडेनच्या उपक्रमाचे कौतुक केले. धरणातील पाणी कमी झाल्यावर गाळ काढण्यासाठीही फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाईल, असे जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी या वेळी सांगितले.

Web Title: The wastewater was prevented from the initiative of the Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.