सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षामुळे उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:24 PM2020-06-26T12:24:42+5:302020-06-26T12:24:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांचे पालन ...

A warning of a hunger strike due to disregard for the demands of the cleaning staff | सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षामुळे उपोषणाचा इशारा

सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षामुळे उपोषणाचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ सफाई कर्मचारी संघटनेचे नेते कुंदन थनवार हे बेमुदत उपोषण करणार आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदमधील सफाई कामगारांच्या समस्यांविषयी मागील चार ते पाच वषार्पासून पाठपुरावा करीत आहे. परंतू दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सफाई कामगार नैसर्गिक हक्कापासून वंचित राहत आहेत. मागण्यांमध्ये सफाई कामगारांना ७ वा वेतन आयोगाच्या फरकाचा एक टप्पा तसेच जानेवारी २०१९ पासून माहे आॅगस्ट महिन्याचा व महागाई भत्ता इत्यादी बाबींचा एकत्रित रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी. २२ ते २४ वर्ष पूर्ण सेवा झालेल्या सफाई कामगारांना कालबद्ध आस्थापनेत प्रगती योजनेंतर्गत लाभ देवून फरक अदा करावा. सफाई कामगारांची पदोन्नती किंवा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
स्वेच्छा निवृत्ती घेणेबाबत अर्ज सादर केलेले आहेत. परंतू ९० दिवसाच्या आत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अध्यादेशानुसार स्वेच्छा निवृत्ती मंजुर व्हावी. सफाई कामगारांना नियमित वेतन दर महिन्याच्या ४ तारखेला राखीव वेतन निधीतून अदा करण्यात यावा. सफाई कामगारांना गणवेश, शिलाई भत्ता, कामाचे साहित्य, ओळखपत्र देण्यात यावे. किमान वेतनानुसार कंत्राटदाराने ४०० रुपये रोज विशेष भत्ता २१८ रुपये प्रति महिना, १६५३८ रुपये एकुण वेतन.
त्यात भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना, पगार राष्ट्रीयकृत बँकेत, पूर्ण पगारी सुट्टी आणि वरील ७ मागण्यांप्रमाणे देण्यात यावे.
यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. आठ दिवसात दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title: A warning of a hunger strike due to disregard for the demands of the cleaning staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.