शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:14 IST2020-07-15T12:14:15+5:302020-07-15T12:14:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कर्जमाफी संदर्भातील प्रश्न व पेट्रोलियम कंपनीकडून शेतकऱ्यांना धमकी या विषयांसदर्भात जिल्हा परिषदेचे ...

Warning of agitation regarding farmers' issues | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कर्जमाफी संदर्भातील प्रश्न व पेट्रोलियम कंपनीकडून शेतकऱ्यांना धमकी या विषयांसदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. दरम्यान, याच वेळी आदिवासी साखर कारखान्याकडे शेतकºयांचे थकीत असलेली रक्कम आठ दिवसात न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संदर्भात भरत गावीत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बँकांकडून पीक कर्ज वाटप सुरू आहे तर दुसरीकडे महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकºयांनाही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. शेतकरी पात्र असताना त्यांना कर्ज देण्याबाबत बँका फिरवा फिरव करीत आहेत. केवळ ऊस लागवड करणाºया शेतकºयांना मोठे कर्ज दिले जाते. तर इतर पीक लागवड करणाºया शेतकºयांना त्याच्याकडे क्षेत्र जास्त असले तरी केवळ १० ते १५ हजार रूपयांपर्यंतच कर्ज मंजूर केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना खरीपाच्या तयारीसाठी बाहेरील सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यातून शेतकरी पुन्हा कर्जबारी होण्याची शक्यता आहे. शिवाय कर्जासाठी शेतीचे कामे सोडून केवळ बँकांच्या दारातच चकरा मारण्यात शेतकºयांचा वेळ जात असल्याने शेती व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्जमाफी प्रक्रियेतील ज्या शेतकºयांना कर्ज माफ झाले आहेत त्या शेतकºयांची प्रक्रिया तत्काळ करून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकºयांना क्रेडिट कार्ड वाटप करण्याबाबत सर्व बँकांना सूचना कराव्यात हे कार्ड नसल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी होवून कर्ज वाटप व इतर प्रक्रियेत दुजाभाव करणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या शिवाय नवापूर तालुक्यातून जाणाºया इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या पेट्रोलियम लाईनमुळे शेतकºयांवर अन्याय होत असून, कंपनीचे अधिकारी मनमानी पद्धतीने काम करून शेतकºयांना धमकावीत आहेत. यासंदर्भातही जोपर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघून समन्वय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

भरत गावीत यांनी नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस देणाºया शेतकºयांची थकीत रक्कम मिळण्याच्या मागणीसंदर्भातही जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कारखान्याने १ डिसेंबर १९ ते १ मार्च २०२० या काळात गाळप केलेल्या उसापैकी सात हजार टन उसाचे पैसे शेतकºयांना दिलेले नाहीत. या बाबत शेकतºयांचे एक कोटी ७० लाख रूपयांचे रक्कम कारखान्याकडे घेणे आहे. ही रक्कम कारखान्याने न दिल्याने शेतकºयांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कारखान्याने थकीत रक्कम आठ दिवसात न दिल्यास नवापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Warning of agitation regarding farmers' issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.