वाण्याविहीरला दोन लाखांचे सीसीटीव्हीचे सेट चोरटय़ांनी केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:20 IST2018-01-28T12:20:21+5:302018-01-28T12:20:26+5:30

Wanaviril has been fined two lakh CCTV sets by thieves | वाण्याविहीरला दोन लाखांचे सीसीटीव्हीचे सेट चोरटय़ांनी केले लंपास

वाण्याविहीरला दोन लाखांचे सीसीटीव्हीचे सेट चोरटय़ांनी केले लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमे:याचे दोन लाख रुपये किंमतीचे दोन सेट चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना 25 रोजी रात्री वाण्याविहीर शिवारात घडली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय वाण्याविहिर शिवारात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहेत. या यंत्रणेतील दोन सेटच चोरटय़ांनी चोरून नेले. 25 रोजी रात्री ही घटना घडली. दोन लाख रुपये किंमतीचे दोन कॅमे:यांचे सेट असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत सुरक्षा रक्षक राहुल नामदेव राठोड यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नाईक करीत आहे.
 

Web Title: Wanaviril has been fined two lakh CCTV sets by thieves