शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. आधीच रहदारी असलेल्या या चौफुलीवर सध्या अवजड वाहनांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. आधीच रहदारी असलेल्या या चौफुलीवर सध्या अवजड वाहनांची गर्दी देखील होऊ लागली आहे. त्यामुळे लहान मोठे अपघात देखील होत आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.धुळे, नवापूर, साक्री भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी वाघेश्वरी चौफुलीचा आधार घ्यावा लागतो. शिवाय शहादा, निझर भागाकडे जाण्यासाठी देखील वळण रस्ता म्हणून या चौफुलीचा आधार घेता येतो. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रहदारी वाढली आहे. नवापूरकडे आणि अक्कलकुवाकडे जाणा:या जड वाहनांची वाहतूक देखील याच भागातून होत आहे. त्यामुळे येथे वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यातच या भागात मोठय़ा प्रमाणावर कच्चे व पक्के अतिक्रमण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.रस्ता गॅरेजवाल्यांसाठी का?धुळे रस्त्यावरील भोणे फाटा ते अव्वलगाझी दग्यार्पयत काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु हा रस्ता रहदारीसाठी कमी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलल्या गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी येणा:या चारचाकी व अवजड वाहनांना उभे राहण्यासाठीच अधीक वापरला जात आहे. परिणामी एकाच वेळी दोन मोठी वाहन निघणेही मोठे जिकरीचे ठरते. त्यामुळे हा रस्ता नेमका वाहतुकीसाठी आहे की गॅरेजवाल्यांसाठी आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्यामुळे देखील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रस्ता खड्डयातकाँक्रीटीकरणाच्या या रस्त्याचे काम अध्र्यातूनच करण्यात आले  आहे. परिणामी दर्गाच्या गेटपासून ते पुढे चौफुलीपर्यत 100 ते 150  मिटरचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. या रस्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. खडी वर आलेली    आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होते. त्याचा परिणाम       लहान मोठे अपघात होण्यास होत आहे. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षया ठिकाणी नियमित दोन वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. कधी या ठिकाणी नेमणूक राहिली तर संबधीत कर्मचारी वाहनचालकांकडून केवळ दंडवसुलीचेच कामे करतात. गॅरेजवाल्यांना समज देणे किंवा वाहतूक सुरळीत करण्याचे काम कमीच होते. त्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. पोलीस दलातील एलसीबीच्या वाहनालाच चुकीच्या दिशेने येणा:या ट्रकने धडक दिल्याची घटना 14 रोजी वाघेश्वरी चौफुलीवर घडली. धडक देणा:या वाहनांने पोलिसांच्या वाहनासह आणखी एका ट्रकला देखील धडक दिली. त्यात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. थोडय़ावर निभावले अन्यथा या ठिकाणी मोठी घटना घडली असती. पोलिसांचेच वाहन या ठिकाणी सुरक्षीत राहू शकत नाही तर सामान्यांच्या वाहनांची काय हाल होत असेल, कशी कसरत होत असेल याचा अंदाज सहज येतो. या अपघातप्रकरणी हवालदार सतिष उगले यांनी फिर्याद दिल्याने पवनसिंग साहेबसिंग मेहर, रा.ताडपिंपळगाव, ता.कन्नड याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार ठाकरे करीत आहे.