महिला बाल विकास व जिल्हा महिला समुपदेशनतर्फे पोलीस ठाण्यास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:18+5:302021-01-10T04:24:18+5:30

पोलीस यंत्राणेबाबत अतिरिक भीती बाळगणे योग्य नाही. पोलीस समाजाचे मित्रच आहेत. त्यांना सहकार्य करणे हे आमचे काम आहे. कर्तव्य ...

Visit to Police Station on behalf of Women and Child Development and District Women's Counseling | महिला बाल विकास व जिल्हा महिला समुपदेशनतर्फे पोलीस ठाण्यास भेट

महिला बाल विकास व जिल्हा महिला समुपदेशनतर्फे पोलीस ठाण्यास भेट

पोलीस यंत्राणेबाबत अतिरिक भीती बाळगणे योग्य नाही. पोलीस समाजाचे मित्रच आहेत. त्यांना सहकार्य करणे हे आमचे काम आहे. कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सर्वसामान्य महिला, विद्यार्थिनी आणि पीडित महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संवाद साधला पाहिजे, असे प्रतिपादन कळमकर यांनी केले.

याप्रसंगी नरेंद्र देवीदास देवराज यांनी पोलीस ठाण्याचे कामकाज कशा प्रकारचे चालते व ते प्रत्येक भागात कसे चालते आणि कोणकोणते विभाग असतात. याठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे गुन्हेगार येतात. या संबंधीची सर्व माहिती त्यांनी महिलांना दिली. कार्यक्रमांसाठी बचत गटाच्या क्षेत्रीय समन्वयक खालेदा खाटीक, सहयोगीनी छाया माळी, चेतना बागुल व बचत गटातील सी.आर.पी.चे अध्यक्ष सोनाली माळी तसेच सचिव रूपाली माळी, कोमल माळी, भाग्यश्री माळी, नीला भामरे, ताराबाई माळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी केंद्राच्या जिल्हा समुपदेशक पूर्वीशा बागुल व रूपाली पगारे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Visit to Police Station on behalf of Women and Child Development and District Women's Counseling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.