शेजवे जि़प शाळेला ग्रामस्थांकडून प्रतिमा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:55 IST2019-08-26T11:55:41+5:302019-08-26T11:55:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील शेजवे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला ग्रामस्थांकडून महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या़ विद्याथ्र्याना ...

Visit images from the villagers at the Shizway Zip School | शेजवे जि़प शाळेला ग्रामस्थांकडून प्रतिमा भेट

शेजवे जि़प शाळेला ग्रामस्थांकडून प्रतिमा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील शेजवे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला ग्रामस्थांकडून महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या़ विद्याथ्र्याना महापुरुषांचे कार्यकतृत्त्व समजून यावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली़ 
ग्रामस्थांतर्फे सरपंच अजय गावीत, उपसरपंच एलिनाबाई वसावे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश वसावे यांच्याहस्ते शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार चौधरी यांना प्रतिमा देण्यात आल्या़ प्रसंगी गौतम पानपाटील, कपिला पानिंगे, ग्रामपंचायत सदस्य तापसिंग पाडवी, माजी सरपंच दिनेश वसावे, राजेंद्र गावीत, पोलीस पाटील योगेश वसावे, हरीष वसावे, कांतीलाल वळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े शाळेतील वर्गखोल्या आणि दर्शनीभागात या प्रतिमा लावण्याच्या सूचना करण्यात आल्या़ विद्याथ्र्याना महापुरुषांच्या कार्याची माहिती मुख्याध्यापक चौधरी अणि सरपंच गावीत यांनी दिली़ विद्याथ्र्यानी महापुरुषांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होत़े 

Web Title: Visit images from the villagers at the Shizway Zip School