शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी भीती न ठेवता लसीकरण व सर्वेक्षणाला सहकार्य करावे : गटविकास अधिकारी घोरपडे यांची मंदाणे येथे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

यावेळी गटविकास अधिकारी घोरपडे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राबविण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात ...

यावेळी गटविकास अधिकारी घोरपडे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राबविण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून गावात आरोग्य, ग्रामपंचायत, महसूल आणि शिक्षण विभाग यांच्यामार्फत कोरोनाबाबत व साथीच्या आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता जो ही त्रास होत असेल त्याबाबत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे सांगितले. दरम्यान, गटविकास अधिकारी घोरपडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांना भेट दिली. यावेळी लसीकरणाविषयी नागरिकांनी गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे. तसेच येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींनाही कोरोनाची लस तालुक्याच्या ठिकाणी देणे सुरू झाले आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेतल्यानंतर दोन दिवस त्रास होतो, तर काहींना होतही नाही. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण करून घेणे हीच आपल्यासाठी मोठी ढाल आहे, असे आवाहन गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले. यावेळी गटविकास अधिकारी घोरपडे यांच्या हस्ते सर्वेक्षण करणाऱ्या टीमला ग्रामपंचायतीमार्फत खरेदी करण्यात आलेल्या पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन व ईतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी सुरेश देवरे, सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक उपस्थित होते.