शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच सहायता निधीद्वारे गावच करणार स्वविकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाकडून येणाऱ्या निधीच्या प्रतिक्षेत न राहता आपत्कालीन स्थिती आणि शैक्षणिक गरजांंची पूर्तता करण्यासाठी ‘सरपंच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून येणाऱ्या निधीच्या प्रतिक्षेत न राहता आपत्कालीन स्थिती आणि शैक्षणिक गरजांंची पूर्तता करण्यासाठी ‘सरपंच सहायता निधी’ निर्माण करण्याचा ऐतिहासिक ठराव बोकळझर ता़ नवापुर ग्रामपंचायतीने केला आहे़ या ठरावाला सर्वांनीच अनुमोदन देत पारित करत स्वविकासाचे पाऊल उचलले आहे़दोन वर्षांपूर्वी बोकळझर गावाला पुराचा फटका बसला होता़ ग्रामस्थांच्या घरांसह शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणावर गावातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते़ यातून सावरण्यासाठी शासनाने दिलेल्या निधीतून बºयापैकी कामे पूर्ण करत गाव पुन्हा नव्याने उभा राहिला आहे़ परंतू पुन्हा अशी आपत्ती आल्यास तातडीने मदत व्हावी यासाठी तसेच कृषी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेवर देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर ‘सरपंच सहायता निधी’ तयार करण्याचा प्रस्ताव ३० जानेवारी रोजी देण्यात आला होता़ या संकल्पनेला ग्रामस्थांनी उचलून धरत सदस्यांनी एकमुखाने ठराव पारित केला़ जिल्हास्तरीय आदर्श गाव तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त असलेल्या बोकळझर ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अनेकविध कारणांमुळे चर्चेत आहे़ सरपंच सहायता निधीरुपाने मिळणारा पैसा हा गरजवंतांना देण्यासोबत हंगामी शेती करणाºया शेतकऱ्यांनाही दिला आहे़ यातून शेतकºयांना बियाणे खरेदी करुन इतर ठिकाणी कर्जासाठी हात पसरावा लागणार नसल्याची माहिती सरपंच राहुल गावीत यांनी दिली आहे़ या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत करण्यात आला असून जिल्ह्यात अशा प्रकारचा निर्णय घेणारी बोकळझर ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे़

साधारण १ हजार लोकसंख्या असलेल्या बोकळझर येथे सरपंच सहायता निधीच्या माध्यमातून गावातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत देण्यात येणार आहे़ हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटंूबांना वैद्यकीय सुविधेसाठी लागणारा खर्च तसेच शेतकऱ्यांना ऐन हंगामात बियाणे, खते, औषधी तसेच मजूरीच्या पैश्यांची गरज भासल्यास चार महिने परतीच्या मुदतीवर १ टक्का व्याजाने कर्ज वितरीत करण्यात येणार आहे़ यातून गावातील गरजूंना मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यासोबत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना सरपंच सहायत निधीतून पुस्तके खरेदीसाठीही रक्कम उपलब्ध करुन देण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला़ सरपंच राहुल गावीत यांच्यासह सर्व सात सदस्यांनी या ठरावांना मान्यता दिली़ यावेळी ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करत निधी उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले़

ग्रामपंचायतीने ठराव केला असला तरी हा निधी शासनाकडून न घेता गावातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे मूळ रहिवासी यांच्याकडे मदतीची मागणी केली जाणार आहे़ सोबत नवापुर तालुका आणि जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींना या उपक्रमाची माहिती देऊन ‘सरपंच सहायता निधी’त वाढ करुन घेण्याची योजना आखण्यात आली आहे़अभिनव अशा या उपक्रमांतर्गत सरपंच सहायता निधीच्या नावाने बँक खाते तयार करुन त्यातील निधीची माहिती वेळोवेळी ग्रामस्थांना देण्यात येईल़ तसेच खर्च आणि जमा याची माहिती दिली जाणार आहे़