तीन वेळा उलटून वाहन पडले रस्त्याच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:27 IST2020-10-12T12:27:14+5:302020-10-12T12:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडा साखर कारखान्यचाचे चेअरन दीपक पाटील यांचे वाहन तीनवेळा उलटले. यामुळे वाहनाचा चक्काचूर झाला. ...

तीन वेळा उलटून वाहन पडले रस्त्याच्या खाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडा साखर कारखान्यचाचे चेअरन दीपक पाटील यांचे वाहन तीनवेळा उलटले. यामुळे वाहनाचा चक्काचूर झाला.
रस्त्यावरून चालणारी गाडी अचानक रस्त्याच्या खाली पडल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच बचाव कार्य सुरू केले. गाडीत सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील असल्याचे पाहिल्यानंतर त्यांना सुखरूप गाडीतून बाहेर काढले. पाहता पाहता या घटनेची माहिती संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांच्यावर डॉक्टर सुरेंद्र पाटील यांनी उपचार केले. या अपघातात पाटील यांना कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की यातून गाडीतील कोणी बचावले असेल यावर विश्वास होत नाही. सुदैवाने त्यांची प्रकृती उत्तम असून कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्याची भेट घेण्यास कोणीही येऊ नये अशी विनंती त्यांचे बंधू प्राचार्य मकरंद पाटील यांनी केली आहे. शहादा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.