शहाद्यात अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:21+5:302021-02-05T08:07:21+5:30
दुसऱ्या सत्रात दुपारी तीन वाजता वने व पर्यावरण वर्धिष्णू कार्यक्रम होणार आहे. त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांच्या रोपांचे वितरण, सीड ...

शहाद्यात अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
दुसऱ्या सत्रात दुपारी तीन वाजता वने व पर्यावरण वर्धिष्णू कार्यक्रम होणार आहे. त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांच्या रोपांचे वितरण, सीड बॉल वितरण आदी पर्यावरण पूरक कार्यक्रम होतील. यावेळी नंदुरबार वनविभाग शहाद्याचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश घुगरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, वनक्षेत्रपाल सचिन खुने, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, उपविभागीय कृषी अधिकारी वि.भा. जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, शहादा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर.बी. घोरपडे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. कोविड १९ ची नियमावली पाळूनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थिताना ही मास्क अनिवार्य आहे. रक्तदान शिबिरात अधिकाधिक दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन गौरव समितीतर्फे करण्यात आले.