शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मंत्री सावंत यांच्यासमोर विविध संघटनांनी मांडले गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : एक दिवसी नंदुरबार दौ:यावर आलेल्या आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांना विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आल़े या वेळी भिल्लीस्थान टायगर सेना व नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत उहापोह करण्यात आला़भिल्लीस्थान टायगर सेनाअक्कलकुवा तसेच मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्याच्या विविध समस्यांबाबत भिलीस्थान टाईगर सेनेच्या वतीने आरोग्यमंत्री डॉ़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : एक दिवसी नंदुरबार दौ:यावर आलेल्या आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांना विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आल़े या वेळी भिल्लीस्थान टायगर सेना व नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत उहापोह करण्यात आला़भिल्लीस्थान टायगर सेनाअक्कलकुवा तसेच मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्याच्या विविध समस्यांबाबत भिलीस्थान टाईगर सेनेच्या वतीने आरोग्यमंत्री डॉ़ दिपक सावंत यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्य विभागाकडून कोटय़ावधींचा निधी खर्च करण्यात येत असतो़ मात्र, अक्कलकुवासह मोलगी येथील ग्रामीण रुणालयात सुविधाचा अभाव आहे. अक्कलकुवा व मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ सोयी-सुविधा वाढवण्यात याव्यात, दवाखान्यातील सर्व विभाग सुरु करण्यात यावे, रुग्णांसोबत सभ्य वर्तन करण्यात यावे आदी मागण्या भिल्लीस्थानतर्फे करण्यात आल्या आहेत़ या वेळी तालुकाध्यक्ष रुपसिंग वसावे, उपाध्यक्ष संतोष तडवी, गुलाबसिंग वसावे,बन्सीलाल पाडवी, लालसिंग वसावे, अमरसिंग पाडवी, पवन तडवी, जलमसिंग तडवी, उमेश तडवी, संदीप तडवी, प्रदीप तडवी, अरविंद तडवी, विनोद तडवी, अभिषेक पाडवी, योगेश तडवी, प्रदीप पाडवी, रोहित तडवी, गिरधर पाडवी, नरपत तडवी आदी उपस्थित होते.नर्मदा बचाओ आंदोलननर्मदा बचाओ आंदोलनातर्फे चेतन साळवे, नूरजी वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी आदींनी डॉ़ सावंत यांना निवेदन दिल़े जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, आरोग्य सेवेसाठी अधिकाधिक यंत्रसामुग्री वाढवावी, प्रस्तावित नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे नवीन पदे वाढविणे या बाबतीत तातडीने मंजुरी देणे, धडगाव येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणे, त्याच प्रमाणे महिला रुग्णालय व सिकलसेल दवाखाना धडगाव येथे सुरु करणे, मानव विकास मिशनअंतर्गत बुडित मजुरी, मातृत्व अनुदान या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े