१०८ रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने शहाद्यात वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:22 IST2020-02-21T13:22:41+5:302020-02-21T13:22:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात अज्ञात व्यक्ती पायी जात असताना शहाद्याहून खेतियाकडे जाणाऱ्या एका ...

वृद्ध Older death in martyr due to untimely arrival of ambulance | १०८ रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने शहाद्यात वृद्धाचा मृत्यू

१०८ रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने शहाद्यात वृद्धाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा-खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात अज्ञात व्यक्ती पायी जात असताना शहाद्याहून खेतियाकडे जाणाऱ्या एका ४०७ वाहनाने पादचारीस जोरदार धडक देऊन फरार झाला. घटनेनंतर तासाभरातही १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहाद्याहून घराकडे निघालेल्या सुरप्या धनजी वाघ (६२) (मूळगाव इस्लामपूर, ह.मु.कलसाडी, ता.शहादा) हे शहादा शहरातून आपल्या सासुरवाडीला कलसाडी येथे जात असताना खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात मागून आलेल्या एका अज्ञात ४०७ वाहनाने धडक दिल्याने सुरप्या वाघ गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर नागरिक जमा झाले. त्यातील आनंद शेवाळे यांनी आरोग्य विभागाच्या १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु तासाभरानंतर ही रुग्णवाहिका घटनास्थळी न आल्याने सुरप्या वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाघ यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अज्ञात वाहन चालक रात्री उशिरा स्वत: पोलीस ठाण्यात वाहनासह दाखल झाला. शहादा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: वृद्ध Older death in martyr due to untimely arrival of ambulance