शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

एटीएमद्वारे फसवणूक करणारी उत्तर प्रदेशची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एटीएमकार्ड फसवणुकीद्वारे स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणा:या उत्तर प्रदेशच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.सैय्यदखान कमालउद्दीन खान (27), तौफीकखान सनाफ मुस्तकीनखान (25) रा.सगरा सुंदरपुरा, जि.प्रतापगड, ओमप्रकाश मनिराम जयस्वारल (21) रा.कोठार मंगलेपूर, जि.प्रतापगड (उत्तरप्रदेश) यांचा संशयीत आरोपींमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एटीएमकार्ड फसवणुकीद्वारे स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणा:या उत्तर प्रदेशच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.सैय्यदखान कमालउद्दीन खान (27), तौफीकखान सनाफ मुस्तकीनखान (25) रा.सगरा सुंदरपुरा, जि.प्रतापगड, ओमप्रकाश मनिराम जयस्वारल (21) रा.कोठार मंगलेपूर, जि.प्रतापगड (उत्तरप्रदेश) यांचा संशयीत आरोपींमध्ये समावेश आहे.जिल्ह्यात तसेच जळगाव, भुसावळ, धुळे, शिरपूर, मुंबई या परिसरात या टोळीने कारनामे केले आहेत. या टोळीतील सदस्य एटीएम मध्ये पैसे काढणा:या लोकांच्या मागे उभे राहून पासवर्ड जाणून घेत असे. त्यानंतर घाईगर्दीत पैसे काढायचे असल्याचे सांगून एटीएमचा डाटा त्यांच्याकडील दुस:या एटीएम कार्डमध्ये स्कॅन करून बनावट कार्ड तयार करीत असे. त्याद्वारे आणि पासवर्डद्वारे ठिकठिकाणाहून पैसे काढून किंवा दुस:या खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक करीत होते.स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर सोन्याबापू नवले यांनी या पद्धतीने एटीएम फसवणूक करणा:या गुन्हेगारांबाबत गोपनीय माहिती काढली. त्यानुसार सैय्यदखान कमालउद्दीनखान, तौफीक खान सनाफ मुस्तकीनखान, ओमप्रकाश मनिराम जयस्वाल यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केल असता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कबुली दिली. या टोळीकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, हवालदार दिपक गोरे, रवी पाडवी, योगेश सोनवणे, भटू धनगर, संदीप लांडगे, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सोनवणे, गोपाल चौधरी, तुषार पाटील, किरण मोरे, किरण पावरा, अभय राजपूत, पंकज महाले यांनी केली.