शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहतुकीचे नियम तोडून पळालात तरी घरबसल्या दंडाची पावती व त्याअनुषंगाने मेसेज येईल. कुठे अपघात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाहतुकीचे नियम तोडून पळालात तरी घरबसल्या दंडाची पावती व त्याअनुषंगाने मेसेज येईल. कुठे अपघात झाल्यास, रहदारी विस्कळीत झाल्यास त्याचा फोटो काढून अ‍ॅप्सवर टाकला तर वाहतूक पोलीस लागलीच त्या ठिकाणी जावून वाहतूस सुरळीत करतील. त्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने महाट्रॅफिक अ‍ॅप तयार केले असून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.वाहतुकीचे नियम तोडले, वाहनांची कागदपत्रे सोबत राहिली नाहीत, त्यामुळे केस झाल्यास लागलीच दंड भरून पावती फाडण्याची गरज नाही. मोबाईलवर मेसेज आल्यास ठराविक दिवसांच्या कालावधीत दंडाची रक्कम भरता येईल किंवा आॅनलाईन देखील भरता येणार आहे. महाट्रॅफिक अ‍ॅपद्वारे ही सुविधा आता वाहतूक पोलीस शाखेने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देतांना पंडित यांनी सांगितले, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी आणि बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई व्हावी याकरीता हे अ‍ॅप्स विकसीत करण्यात आले आहे.वाहतुक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता, त्यांच्या कामाची मर्यादा आणि इतर बाबी लक्षात घेता आता आॅनलाईनवर सर्व भर दिला जात आहे. नंदुरबारात याद्वारे दंड करणे, कारवाई करणे या बाबी गेल्या महिनाभर आधीपासूनच सुरु करण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांना त्याबाबत प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे. त्याचा चांगला परिणाम आणि कारवाईची संख्या वाढण्यास मदत झाली असल्याचेही पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट केले.दोन प्रकारचा उपयोगया अ‍ॅप्सद्वारे रहदारीचे नियम तोडणाºयांवर कारवाई करणे आणि वाहतूक व्यवस्था सुधारणे हे दोन उपयोग महत्वपुर्ण आहेत. एखाद्या वाहन चालकाने सिग्नलची तोडून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन चालवून नेले, वाहन चालवितांना मोबाईलव बोलणे, पार्र्कींग नसतांना तेथे बेशिस्तपणे वाहन पार्र्कींग करणे, सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे. तीन सीट दुचाकी चालविणे, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसविणे आदी नियम तोडल्यास संबधीत चालकाचा आणि वाहनाचा फोटो अ‍ॅप्समध्ये काढून कारवाई करता येणार आहे. त्यामुळे कुणी नियम तोडून निघूनही गेला तरी त्याला दंडाची पावती मोबाईलवर घरबसल्या येणार आहे.दुसरा उपयोग हा एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल, रस्त्यावर आॅईल किंवा लिक्विड पडलेले असेल, झाड पडलेले असेल, वाहतुक कोंडी झालेली असेल तर या अ‍ॅपद्वारे फोटो काढून कुणीही नागरिकाने टाकल्यास लागलीच वाहतूक पोलिसांना त्या ठिकाणी जावून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करता येऊ शकणार आहे.नंदुरबार शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग या अ‍ॅप्सचा करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना संबधीत उपकरण देखील देण्यात आले आहे.वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाशी कुणी हुज्जत घातल्यास, कुणी दंडाची पावती फाडण्यास नकार दिला, कुणाजवळ दंडाचे पैसे भरण्यास नसल्यास आणि वाहतूक पोलिसाने वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढून कुठल्या नियमाअंतर्गत कारवाई केली ते संबधीताच्या रजिस्टर मोबाईलवर पाठविता येणार आहे.इंटरसेप्टर वाहनाचाही होतोय उपयोग...नंदुरबार शहरात वाहतुकीच्या नियोजनासाठी वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासनाने नंदुरबार वाहतूक शाखेला इंटरसेप्टर वाहन देखील उपलब्ध करून दिले आहे. या वाहनात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. मर्यादेपेक्षा अधीक वेगात वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, काळी काचचा लेअर किती आहे ते मोजणे, वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणाºयांवर कारवाईचे उपकरणे या वाहनात बसविण्यात आले आहेत. त्याचाही चांगला उपयोग होत आहे.