सहा महिन्याची घरपट्टी माफचे झळकले विनापरवाना होर्डींग्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:25 PM2020-10-19T21:25:44+5:302020-10-19T21:25:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेने सहा महिन्याची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतलेला नसतांना काही खोडसाळ मंडळींकडून अशा ...

Unlicensed hoardings flashed for six months | सहा महिन्याची घरपट्टी माफचे झळकले विनापरवाना होर्डींग्ज

सहा महिन्याची घरपट्टी माफचे झळकले विनापरवाना होर्डींग्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार पालिकेने सहा महिन्याची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतलेला नसतांना काही खोडसाळ मंडळींकडून अशा प्रकारचा निर्णय झाल्याची बॅनर व होर्डींग शहरात लावण्यात आले आहेत. जे कोणी असे होर्डींग लावले असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिला आहे. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेची सभा दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन झाली. सभेत २१ विषय मंजुर करण्यात आले. सभेत पालिकेने सहा महिन्यांची घरपट्टी माफ केली किंवा असा प्रस्ताव विरोधकांच्या मागणीवरून मंजूर केला हे खोटे आहे. सभेच्या अजेंड्यावर तसा विषयच नव्हता. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ मधील तरतुदींमध्ये नगरपरिषदांना अशा प्रकारे घरपट्टी माफ करण्याचे अधिकार नाहीत. ही वस्तूस्थिती असतांना शहरात काही ठिकाणी पालिकेने भाजपच्या नगरसेवकांच्या मागणीवरून सहा महिन्यांसाठी घरपट्टी माफ केल्याच्या निर्णय झाल्याचा उल्लेख असलेले होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. 
वास्तविक असा निर्णयच झाला नाही आणि पालिकेला तो अधिकारच नसतांना नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही खोडसाळ मंडळींनी चालविला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा खोट्या माहितीला बळी पडू नये असे आवाहन करून जे कोणी अशा प्रकारचे होर्डींग्ज लावले असतील त्यांनी ते त्वरीत काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. 
पालिकेच्या सभेत झालेले निर्णय  असे, कोरोनामुळे मालमत्तांचे जनरल रिव्हीजन करणे उचीत होणार नाही. त्यामुळे यंदा चतुर्थ वार्षिक अकारणी करण्यात येऊ नये. मालमत्ता धारकांना बील मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत थकबाकीसह संपुर्ण रक्कम भरल्यास त्यांना दहा टक्के सूट देण्यात येणार असे निर्णय झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: Unlicensed hoardings flashed for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.