शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात रंगणार विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव (युवारंग) येथील पूज्य साने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव (युवारंग) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात १६ ते २० जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.विद्यापीठ प्राधिकरणाच्या धोरणानुसार विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यापीठ संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था, शैक्षणिक प्रशाळा विभागातील नियमित विद्यार्थ्यांसाठी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना ६ जानेवारी २०२० पावेतो संघ नोंदणी करता येणार आहे. आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंगमध्ये पाच कला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात संगीत प्रकारात शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन (ताल वाद्य व सूर वाद्य ), सुगम गायन (भारतीय व पाश्चिमात्य), समूहगीत (भारतीय व पाश्चिमात्य), लोकसंगीत, भारतीय लोकगीतांचा समावेश आहे. नृत्य प्रकारात समूह लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याचा समावेश असून साहित्य कला या प्रकारात वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन स्पधेर्चा समावेश आहे.नाट्य कला प्रकारात विडंबन नाट्य, मूकनाट्य व मिमिक्री स्पर्धेचा समावेश असून ललीत कला या प्रकारात रांगोळी, चित्रकला, कोलाज व्यंगचित्र, क्ले मॉडलिंग, फोटोग्राफी, इंस्टॉलेशन, मेहंदी या कला प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. युवक महोत्सवात सहभागी सर्व संघामधून सर्वसाधारण विजेत्यास डॉ.जी.डी. बेंडाळे फिरता स्मृती चषक तर उपविजेत्यास कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी फिरता स्मृती चषक देण्यात येईल. युवारंग आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून युवारंग यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.