सातपुड्यातील अतिदुर्गम भागात दिवाळी समर्पणाचा अनोखा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:33 IST2020-11-21T12:33:32+5:302020-11-21T12:33:39+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा :  सालाबादाप्रमाणे यावर्षीही विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे तोरणमाळ परिसरात सातपुड्याच्या कुशीत ...

A unique celebration of Diwali dedication in a remote area of Satpuda | सातपुड्यातील अतिदुर्गम भागात दिवाळी समर्पणाचा अनोखा सोहळा

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात दिवाळी समर्पणाचा अनोखा सोहळा

 लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा :  सालाबादाप्रमाणे यावर्षीही विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे तोरणमाळ परिसरात सातपुड्याच्या कुशीत आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी समर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जीवन जगताना अनेक कुटुंबांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु  सगळीकडेच आपण पोहोचू शकत नाही. परंतु आपल्याने जेवढे शक्य होईल तेवढं आपल्या हातून सेवा करणे व समाजातील  गरजू बांधवांना सहकार्य करणे               हा धर्म व आपले कर्तव्य समजून  दरवर्षी विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे आदिवासी बांधवांसाठी दिवाळी भेट व समर्पण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या वेळी शहादा, नंदुरबार, शिरपूर, निझर, तळोदा व विविध शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या  सर्व व्हीएसजीजीएम स्वयंसेवकांनी एकत्र येत या कार्यक्रमात आपली निस्वार्थ सेवा दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  म्हसावद परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रिद्धी-सिद्धी विनायक गणपतीचे दर्शन घेऊन या सेवेचा सर्व स्वयंसेवकांनी शुभारंभ केला. या सेवेत सहभागी होत कहाटूळ, ता.शहादा येथील ग्रामस्थांकडून झापी, ता.धडगाव  येथील कुटुंबियांना गुजर समाजाची प्रसिद्ध मिठाई ‘संजोरी’   प्रदान करण्यात आली. विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळाचे सदस्य व समाजातील अनेक दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या परिसरातील समाजबांधवांना किराणा सामानासह, ब्लँकेट, चादर, फराळ, मिठाई, चप्पल, आवश्यक त्याठिकाणी वैद्यकीय उपचार करून दिवाळीनिमित्त मानव सेवा करत दीपावलीचा खराखुरा आनंद  व समाधानाचा अनुभव  घेतला.

खडतर वाटेतून केला प्रवास...
खडकी व झापी हा तोरणमाळ परिसरातील अत्यंत दुर्गम असा परिसर व त्याठिकाणी पोहोचण्यासाठी खडतर अशी वाट आणि विपरीत परिस्थिती. तरीही या स्वयंसेवकांनी या समाज बांधवांपर्यंत पोहोचून आपला दिवाळी समर्पण व भेट हा संकल्प पूर्ण केला. याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या या समाजसेवेचे कौतुक करण्यात येत आहे. या समर्पण सेवेदरम्यान दिवाळीनिमित्त लेवा गुजर समाजातील आर्थिकरित्या दुर्बल कुटुंबानाही दिवाळी भेट म्हणून फराळ व मिठाईसह रोजच्या गरजेचा सामानाचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या अशा ५२ कुटुंबाना एक महिन्याचे किराणा साहित्य, दिवाळी फराळ व थंडीच्या बचावासाठी ब्लॅन्केट आदी वस्तूंचे किट व्हीएसजीजीएमच्या माध्यमातून गावोगावी दिवाळी भेट म्हणून देण्यात आले.

Web Title: A unique celebration of Diwali dedication in a remote area of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.