कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:27 IST2018-02-22T13:27:04+5:302018-02-22T13:27:11+5:30

Underground work in the Kukadipadar area | कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच

कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच

ऑनलाईन लोकमत
वाण्याविहीर, दि़ 22 : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चापडी कुकडीपादर ते अरेढी यादरम्यान असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आह़े त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आह़े
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 2013 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले होत़े या ठिकाणी एकूण चार पुलांची काम अपूर्ण  अवस्थेत पडून असल्याने या रस्त्यावर वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आह़े  तसेच रस्त्याचे काम सुरू असताना मजुरांची मजुरी देखील मिळाली        नाही़ 
अक्कलकुवा तालुक्यातील चापडी कुकडीपादर ते अरेढी हा अत्यंत दुर्गम भागात मोडला जात असतो़ त्यामुळे या ठिकाणी दळणवळण व्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्व आह़े परंतु गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचे काम रखडले असल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े 
 

Web Title: Underground work in the Kukadipadar area