सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार उद्धव ठाकरेंचे धडगाव येथील सभेत प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:14 IST2019-10-12T14:14:11+5:302019-10-12T14:14:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील कुपोषण संपविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. दहा रुपये जेवनाची योजना देखील त्यातीलच ...

सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार उद्धव ठाकरेंचे धडगाव येथील सभेत प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ातील कुपोषण संपविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. दहा रुपये जेवनाची योजना देखील त्यातीलच एकच असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धडगाव येथील प्रचार सभेत बोलतांना केले. केवळ सहा मिनिटात त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.
अक्कलकुवा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ धडगाव येथील ठकार महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची शनिवारी दुपारी सभा झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मिलींद नाव्रेकर, नंदुरबारच्या खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, उमेदवार आमशा पाडवी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, अक्कलकुवा मतदारसंघ युतीअंतर्गत हक्काने मागून घेतला आहे. त्यामुळे येथून राज्याची विजयाची सुरुवात करावयाची आहे. या भागातील स्थलांतर थांबवून रोजगाराची समस्या निकाली काढण्यात येणार आहे. सातपुडय़ातील आरोग्य आणि कुपोषणाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.