भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार

By मनोज शेलार | Updated: January 8, 2024 17:30 IST2024-01-08T17:30:12+5:302024-01-08T17:30:38+5:30

भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Two youths on a two-wheeler were killed in a collision with a speeding vehicle | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार

नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोनजण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी लांबोळा, ता. शहादानजीक घडली. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जयपालसिंग चंद्रसिंग गिरासे (३३, रा. दोंदवाडा, ता. पानसेमल) व राजेंद्र सुनील मराठे (३४, रा. यशोधन कॉलनी, शहादा) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनुसार, गिरासे व मराठे हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एके ३८३६) नंदुरबारकडे जात असताना त्यांनी लांबोळानजीक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तेथून बाहेर निघत असताना भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन तेथून भरधाव पसार झाले. याबाबत संदीप सोहनसिंग गिरासे यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अभिजीत अहिरे करीत आहेत.

Web Title: Two youths on a two-wheeler were killed in a collision with a speeding vehicle

टॅग्स :Accidentअपघात