कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:13 IST2019-12-05T12:12:56+5:302019-12-05T12:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार-धानोरा ...

Two-wheeler killed in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार-धानोरा रस्त्यावर ३ रोजी सायंकाळी उशीरा घडली. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांतिलाल कर्मा पाडवी (३८) रा.पिंपळोद, ता. नंदुरबार असे मयताचे नाव आहे. धानोराकडून नंदुरबारकडे येणाºया भरधाव कारने (क्रमांक एमएच १२ आरएफ ३९८०) समोरून येणाºया दुचाकीला पिंपळोदनजीक जबर धडक दिली. त्यात कांतिलाल पाडवी यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक तेथून पसार झाला. याबाबत जितेंद्र मुकुंद वळवी यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गावीत करीत आहे.

Web Title: Two-wheeler killed in car crash