शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

दोन वर्षात दोन हजार पुरुषांची नसबंदी

By admin | Published: January 24, 2017 12:43 AM

पाच वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी : महिलांच्या शस्त्रक्रियाही वाढल्या

नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा नंदुरबार जिल्ह्याने पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात आघाडी घेतली असून, दोन वर्षात तब्बल दोन हजार पुरुषांची नसबंदी करण्यात आली आह़े आरोग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी  पाच वर्षात 60 टक्के  उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने पूर्ण केले आह़े    महिलांच्या संततीनियमन शस्त्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्याची प्रगती झाली असून दोन वर्षात 10 हजार महिलांच्या शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यातील सर्व 58 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर आठवडय़ाला शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येत़े या शिबिरातून महिला आणि पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना त्यांच्या वर्गवारीनुसार शासनाने ठरवून दिलेला भत्ता वाटप करण्यात येत आह़े यंदाच्या आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा काळ शिल्लक आह़े तत्पूर्वी आरोग्य विभागाने चार हजार महिलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आह़े यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 11 हजार 181 शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े यात 930 पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े यात डिसेंबर अखेरीर्पयत 920 पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ येत्या तीन महिन्यात साधारण 200 पुरुषांची नसबंदी होणार असल्याने यंदा विभागाकडून 100 टक्क्यांपेक्षा अधिक कामकाज होणार आह़े महिलांच्या शस्त्रक्रियेलाही वेग असून अद्याप तीन हजार 814 शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत़ 458 आरोग्य केंद्रांमध्ये दर आठवडय़ाला या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात केवळ तीन सजर्न आहेत़ उर्वरित आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयांच्या सजर्नला आमंत्रित करण्यात येऊन ही शिबिरे पूर्ण करण्यात येतात़ जिल्हा आरोग्य विभागात एमबीबीएस अर्हता प्राप्त असलेल्या डॉक्टरांना शासनच सजर्न होण्यासाठी सहाय्य करत़े मात्र या प्रक्रियेत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टरांचा सहभाग कमी असल्याने सजर्न्सची संख्याही अत्यंत कमी आह़े लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पुरुष आणि महिलांच्या शस्त्रक्रिया वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत़ यात पुरुष आणि महिलांना भत्ता देण्यात येतो़ यात पुरुषांना एक हजार 300 रुपये तर त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणा:यांना 200 रुपये देण्यात येतात़ दारिद्रय़रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या पुरुषांना एक हजार 350 रुपये देण्यात येतात़ नर्मदा खो:यातील पुरुषांनी या नसबंदी केल्यास त्यांना आरोग्य विभाग 351 रुपये जादा देत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 4शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी पुरुषांना दिल्या जाणा:या भत्त्यापेक्षा महिलांना दिली जाणारी रक्कम त्या मानाने कमी असूनही दर वर्षी साधारण सात हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात़ या महिलांना शस्त्रक्रियेसाठी 600 रुपये देण्यात येतात़ यात दारिद्रय़ रेषेखालील महिलांना 250 रुपये जादाचे देण्यात येतात़ 4महिला आणि पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी दुर्गम व अति दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक गर्दी होत असल्याची माहिती आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी एका आरोग्य केंद्रात आठवडय़ाला 30 शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती आह़े या पुरुषांची संख्या सरासरी तीन ते पाच एवढी आह़े हीच संख्या सपाटीच्या तालुक्यात दोन आठवडय़ानंतर दोन ते चार असल्याचे दिसून आले आह़े पुरुषांना नसबंदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी जिल्ह्यात काम करणा:या आशा, पाडासेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी काम करत आहेत़ 4आरोग्य विभागाने पाच वर्षात जनजागृती आणि शिबिरे यांच्यामार्फत शस्त्रक्रियांची संख्या वाढवली असल्याचे आरोग्य केंद्रांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आह़े 4आरोग्य विभागाने नंदुरबार जिल्ह्यात सजर्नची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास, जिल्ह्यात नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रियांचे शासकीय उद्दिष्ट हे वेळेपूर्वीच पूर्ण होणार आह़े जिल्ह्यात होणा:या नसबंदी व संततीनियमन शस्त्रक्रियांचा 2013 ते 2016 डिसेंबरअखेर्पयत आढावा घेतला असता, दरवर्षी चढे उद्दीष्ट मिळाल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शस्त्रक्रियांचे आकडेही चढेच ठेवले आहेत़42012-13 मध्ये जिल्हा आरोग्य विभागाला नऊ हजार 417 शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट होत़े यात पुरूषांच्या 2200 शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट होत़े यापैकी महिलांच्या सात हजार 760 तर पुरूषांच्या 760 शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या़ 42013-14 मध्ये 9 हजार 417 या उद्दीष्टापैकी 2200 पुरूषांच्या शस्त्रक्रिया करावयाच्या होत्या़ यात सात हजार 416 महिला तर 626 पुरूषांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ 42014-15 मध्येही नऊ हजार 417 उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यापैकी महिलांच्या सहा हजार 635 तर पुरूषांच्या 2200 पैकी 693 नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़ 4सलग तीन वर्ष सारखे उद्दीष्टय़ देण्यात आलेल्या नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची कामगिरी पाहून आरोग्य विभागाने 2015-16 या आर्थिक वर्षासाठी नऊ हजार 80 शस्त्रक्रियांचे  उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यातून 1 हजार 806 पुरूषांच्या शस्त्रक्रिया करावयाच्या होत्या़ यापैकी एक हजार 106 पुरूष तर सात हजार 248 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़