शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार हेक्टर पीक पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतक:यांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतक:यांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या शेतक:यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा असून, शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.गेल्या 15 दिवसांपूर्वी संपूर्ण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावला होता. त्यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील कृषी विभाग व महसूल कर्मचा:यांच्या संयुक्त मोहिमेने युद्धपातळीवर शेतक:यांच्या शेतात जावून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील चार हजार 453 शेतक:यांचे साधारण एक हजार 970 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त कापूस पिकाला फटका बसला आहे. साधारण एक हजा 604 हेक्टर क्षेत्रातील या पिकाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याखालोखाल ज्वारीचे झाले आहे. 115 हेक्टर ज्वारीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचेही जवळपास 100 हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय केळी व पपई या नगदी पिकांचेही साधारण 25 हेक्टरचे नुकसान झाले आहे.कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. आता पुढील कार्यवाही तातडीने प्रशासनाने करून शेतक:यांना भरपी देण्याची अपेक्षा आहे. शेतक:याचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. कारण 90 टक्यांपेक्षा अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतक:यांचा झालेला खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी रब्बीकडे वळला आहे. परंतु त्यांच्याकडे रब्बीला लागणारा खर्चदेखील हातात नाही. त्यामुळे रब्बीचा पीक पेरा, रासायनिक खतांचा खर्च कुठून आणावा. आधीच त्याने खाजगी सावकाराबरोबरच उधार-उसनवारीने पैसे घेतले आहे. ते पैसे कसे फेडावे अशा विवंचनेत असल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे. शासनाने शेतक:यांचा रब्बी हंगाम लक्षात घेऊन नुकसान भरपाई दिली तर खरीपाचा नुकसानीचा बसलेला फटका विसरून रब्बीकडे निदान त्यांच्या आशा पल्लवीत राहतील. परंतु यासाठी प्रशासन व राजकारण्यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवण्याची अपेक्षा आहे.

तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, तळवे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी अवकाळी झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधीत यंत्रणेने अद्यापही त्याच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. याबाबत संबंधत शेतक:यांनी तक्रारीही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना कापसाचे पंचनामे न करण्याचेही महसूल कर्मचा:यांनी सांगितल्याचे हे शेतकरी सांगतात. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने याप्रकरणी दखल घेऊन अशा शेतक:यांच्या कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश आपल्या कर्मचा:यांना द्यावेत, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे.